Chandrakant Pandit KKR : लष्करी शिस्तीचा माणूस... केकेआरमध्ये ऑल इज नॉट वेल; कोच चंदू पंडितांवर खेळाडू नाराज, रिंकू सिंगचं नाव....

Chandrakant Pandit KKR
Chandrakant Pandit KKResakal

Chandrakant Pandit KKR : चंद्रकांत पंडित हे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एक नावाजलेलं नाव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, विदर्भ, मध्य प्रदेश यांनी रणजी ट्रॉफी पटकावली होती. 2023 पासून हे चंदू पंडित कोलकाता नाईट रायडर्सचे हेड कोच म्हणून आयपीएलमध्ये काम पाहत आहेत. पहिल्याच हंगामात संघातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले असताना त्यांच्या नेतृत्वात संघाने झुंजार खेळ केला.

मात्र चंद्रकांत पंडित यांची केकेआरमधील कार्यशैली अनेक खेळाडूंना खटकली. संघातील अनेक विदेशी खेळाडूंना त्यांची शिस्त आवडलेली नाही. केकेआरचा विदेशी खेळाडू डेव्हिड विजने पंडितांच्या कार्यशैलीवर एका पॉडकास्टशी बोलताना टीका केली.

Chandrakant Pandit KKR
Rohit Sharma SRH vs MI : वेड्या चाहत्यांची वेडी माया... रोहितसाठी चाहते तीन तास उभे राहिले उन्हात

सॅम केर याच्या पॉडकास्टमध्ये बोलताना डेव्हिड म्हणाला की, 'संघात काही गोष्टींवरून समस्या होत आहे. काही खेळाडू विशिष्ट गोष्टीवरून खुश नाहीयेत. यातील अनेक गोष्टी या ड्रेसिंग रूममधील आहेत. संघात नवीन कोच आले आहेत. ते काही गोष्टी त्यांच्या पद्धतीने करू इच्छितात. मात्र या गोष्टी काही खेळाडूंना आवडलेल्या नाहीत.'

डेव्हिड पुढे म्हणला की, 'खेळाडू खूप नाराज झाले आहेत कारण बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षकांनी काही नव्या गोष्टी आणल्या आहेत. मात्र विदेशी खेळाडूंसाठी या गोष्टी कधी कधी अडचणीच्या ठरत आहेत. हे प्रशिक्षक भारतात लष्करी शस्तीचे प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. ते खूप कडक आणि शिस्तप्रीय आहेत.'

परदेशी खेळाडू जे जगभरातील लीग क्रिकेट खेळत असतात. त्यांना कोणी येऊन कसं वागायचं काय घालायचं हे सांगितलेलं आवडत नाही. मला काही समस्या नव्हती. मात्र काही खेळाडू आहेत जे माझ्यापेक्षा जास्त हट्टी आहेत.'

डेव्हिड प्ले ऑफ बद्दल देखील बोलला. तो म्हणाला की, 'स्पर्धा सुरू झाली आहे. तुम्हाला तुम्ही क्वालिफाय व्हाल की नाही याची थोडी कल्पना येते. तुम्ही खेळत आहात की नाही हा प्रश्न नाही. फक्त तुम्ही तुमच्या कुटुंबापासून अजून काही आठवडे दूर राहणार आहात. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी सामन्याचा निकाल फारसा महत्वाचा नाही. मी माझ्या वैयक्तिक कामगिरीला महत्व देतो.'

Chandrakant Pandit KKR
Rohit Sharma SRH vs MI : मुंबई इंडियन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय... रोहित मैदानावर उतरताच करणार मोठा विक्रम

डेव्हिड रिंकू सिंहचं नाव घेऊन म्हणाला, 'एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर तुम्ही त्याचं कौतुक करता. रिंकू सिंहने पाच षटकार मारले. तुम्ही त्याचे कौतुक करणार नाही का? यात सामन्याचा निकाल काय लागला याच्यावर जास्त भर नसतो. तुम्ही तिथे बसून तुम्ही जिंकता की नाही हे पाहत नाही. तिथे तुम्ही वैयक्तिक कामगिरीवर जास्त भर देण्यास सुरूवात करता.'

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com