PBKS vs MI : आर्चरची 4 षटकात हाफ सेंचुरी; लिव्हिंगस्टोनने जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने केली धुलाई

Punjab Kings vs Mumbai Indians
Punjab Kings vs Mumbai Indians esakal

Punjab Kings vs Mumbai Indians : पंजाब किंग्जने मुंबईविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 3 बाद 214 धावा ठोकत मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याला जितेश शर्माने नाबाद 49 धावा करून चांगली साथ दिली. मुंबईकडून पियुष चावलाने 2 तर अर्शद खानने एक विकेट घेतली.

नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पंजाबनेही पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात करत 7 षटकात साठी पार केली. अर्शद खानने प्रभसिमरन सिंगला 9 धावांवर बाद केल्यानंतर शिखर धवन आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबला अर्धशतक पार करून दिले होते. ही जोडी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करणार इतक्यात पियुष चावलाने 20 चेंडूत 30 धावा करणाऱ्या शिखर धवनला बाद केले.

शिखर धवन बाद झाल्यानंतर मॅथ्यू शॉर्टही 26 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र लिम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजबला 170 धावांच्या पार पोहचवले. लिव्हिंगस्टोनने 32 चेंडूत आपले अर्धशतक ठोकले.

लिव्हिंगस्टोनने अर्धशतक ठोकले त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी करत 42 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या होत्या. त्याला साथ देणाऱ्या जितेश शर्माने 24 चेंडूत नाबाद 49 धावा ठोकल्या या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 119 धावांची भागीदारी रचत पंजाबला 20 षटकात 3 बाद 214 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com