IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Live Score Updates : आयपीएल 2024 मध्ये शनिवारी दोन सामन्याचा धमाका पाहिला मिळाला. दिवसाचा दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला.
IPL 2024 LSG vs RR Live Score Updates News Marathi
IPL 2024 LSG vs RR Live Score Updates News Marathiesakal

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय क्वालिफायरमध्ये

लखनौ सुपर जायंट्सचे 197 धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्सने 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. संजू सॅमसनने 33 चेंडूत 71 धावा केल्या तर ध्रुव जुरेलने 34 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या.

IPL 2024 LSG vs RR Live Score : केएल राहुलची दमदार खेळी मात्र राजस्थानने लखनौला 200 च्या आतच रोखले

केएल राहुलने 48 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र राजस्थानने चांगली गोलंदाजी करत लखनौला 20 षटकात 5 बाद 196 धावात रोखले.

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

केएल राहुल आणि दिपक हुड्डा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची दमदार शतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. मात्र हुड्डा अर्धशतकानंतर लगचेच बाद झाला. लखनौने 15 षटकात 3 बाद 150 धावा केल्या आहेत.

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

लखनौ सुपर जांयट्सने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात खराब सुरूवात केली. बोल्टने डिकॉकला 8 धावांवर तर संदीप शर्माने गेल्या सामन्यातील हिरो मार्कस स्टॉयनिसला शुन्यावर बाद केले. यानंतर केएल राहुल आणि दिपक हुड्डा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी संघाला 8 षटकात 75 धावांपर्यंत पोहचवलं. यात केएलचं 45 धावांचं योगदान होतं.

IPL 2024 LSG vs RR Live Score : राजस्थानने नाणेफेक जिंकली; संजू प्ले ऑफचा खुट्टा अजून बळकट करण्यासाठी सज्ज

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थानावर असलेला राजस्थान आपला प्ले ऑफमधील स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने आजचा सामना खेळेल. तर लखनौ प्ले ऑफच्या अजून जवळ जाण्यासाठी जोर लावेल.

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Live Score Updates :

राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 7 विकेट्सनी पराभव करत प्ले ऑफच्या दिशेने कूच केली आहे. राजस्थानचा हा सलग चौथा विजय आहे. आतापर्यंतच्या 9 सामन्यापैकी राजस्थानने 8 सामने जिंकले आहेत. त्यातील 6 सामन्यात त्यांनी चेस करत सामना जिंकला आहे.

लखनौचे 196 धावांचे आव्हान राजस्थानने 19 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. संजू सॅमसनने 71 धावांचे तर ध्रुव जुरेलने 52 धावांचे योगदान दिलं. बटलरने 34 तर यशस्वीने 24 धावा करत 60 धावांची सलामी दिली होती. यानंतर संजू आणि ध्रुव जुरेलने 123 धावांची नाबाद भागादारी रचली.

राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 बाद 196 धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये दोन धक्के बसल्यानंतर केएल राहुल (76 धावा) आणि दिपक हुड्डा (50 धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची शतकी भागीदारी रचली. मात्र हुड्डा अर्धशतक ठोकून लगेचच बाद झाला.

त्यानंतर केएल राहुलने संघाला 15 षटकात 150 धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर लखनौने 17 षटकात 170 धावांपर्यंत मजल मारली. मात्र राहुल 76 धावा करून बाद झाल्यानंतर लखनौची धावगती मंदावली. त्यांना 20 षटकात 5 बाद 196 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानकडून संदीप शर्माने 2 तर आवेश, बोल्ट आणि अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com