LSG vs MI Eliminator : 5 धावा 5 विकेट्स माधवालने लखनौच्या नवाबी थाटची लावली वाट

Lucknow Super Giants vs Mumbai Indians
Lucknow Super Giants vs Mumbai Indians esakal

Lucknow Super Giants vs Mumbai Indians :

मुंबई इंडियन्सने ठेवलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला 101 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईच्या आकाश माधवालने नवीन उल हकचा दमदार स्पेल वाय घालवला. माधवालने 3.3 षटकात फक्त 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तर लखनौचे तीन फलंदाज धावबाद झाले. लखनौची मुंबईच्या गोलंदाजांसमोर पळता भुई थोडी झाली. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने झुंजार 40 धावांची खेळी केली. त्यानंतर कायल मेयर्स (18) आणि दीपक हुड्डा (15) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्यापासून आक्रमक खेळणाऱ्या मुंबईला नवीन उल हकने मुंबईचे रोहित शर्मा, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माची शिकार केली. मात्र मुंबईचा इम्पॅक्ट प्लेअर नेहाल वधेराने 12 चेंडूत 23 धावा चोपत मुंबईला 182 धावांपर्यंत मजल मारून दिली. मुंबईकडून ग्रीनने सर्वाधिक 41 तर सूर्याने 33 धावांचे योगदान दिले. तिलकनेही 26 धावा करून हातभार लावला.

शेवटच्या दोन षटकात वधेराचा धडाका

नवीन उल हकने मुंबईचे चार फलंदाज बाद केल्यानंतर 19 व्या षटकात मोहसीन खानने फक्त 6 धावा देत ख्रिस जॉर्डनला बाद केले. आता शेवटचे षटक यश ठोकूरने टाकले. मात्र नेहाल वधेराने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. मात्र पुढचा चेंडू निर्धाव गेला. मात्र वधेराने पुढच्या दोन चेंडूवर एक षटकार आणि चौकार मारत मुंबईला 180 धावांच्या पार पोहचवले. मात्र शेवटच्या चेंडूवर 12 चेंडूत 23 धावा ठोकणारा वधेरा बाद झाला. मुंबईने लखनौसमोर 182 धावांचा डोंगर उभारला.

नवीन उल हकचा भेदक मारा

मुंबई या दमदार सुरूवातीच्या जोगावर मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच नवीन उल हकने आधी सूर्याला आणि मग ग्रीनला बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले. यानंतर टीम डेव्हिडही 13 धावांची भर घालून माघारी परतला. टीम डेव्हिड बाद झाल्यानंतर तिलक वर्माने मुंबईला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र त्याचीही शिकार नवीन उल हकने केली. वर्मा 21 चेंडूत 22 धावा करून बाद झाला.

सूर्यकुमार - ग्रीनची जोडी जमली

रोहित आणि इशान बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन यांनी मुंबई इंडियन्सचे रनरेट खाली येऊ दिले नाही. सूर्यकुमारने 20 चेंडूत 33 धावा ठोकल्या तर ग्रीनने 41 धावांचे योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी रचत संघाला 11 व्या षटकात शतकी मजल मारून दिली.

रोहित पाठोपाठ इशान किशनही माघारी

सामन्याच्या चौथ्या षटकात रोहित शर्मा 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात इशान किशनला यश ठाकूरने 15 धावांवर बाद केले.

दमदार सुरूवात करता करता मुंबईला बसला मोठा धक्का

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी 3 षटकात 30 धावा ठोकल्या. इशान किशन आक्रमक फलंदाजी करत होता तर रोहित शर्मा त्याला सावध साथ देत होता. मात्र चौथ्या षटकात नवीन उल हकने 10 चेंडूत 11 धावा करणाऱ्या रोहित शर्माला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला.

मुंबईने अर्धी लढाई जिंकली

मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

फिरकीचा असेल बोलबाला

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर तसेही खेळपट्टी फिरकीला थोडीफार का असेना साथ देते. त्यात काल याच मैदानावर चेन्नई आणि गुजरात यांच्यात सामना झाला होता. त्यात देखील चेन्नईच्या फिरकीने चांगला दम दाखवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील फिरकीचा बोलबाला असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com