IPL 2024 Shivam Dube : उसळत्या चेंडूवर दुबे आता सक्षम ; प्रशिक्षक माईक हसींनी श्रेय दिले महेंद्रसिंग धोनीला

गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स संघाने पहिल्या दोन लढतींत शानदार विजय मिळवत आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात अपेक्षेनुसार केली. या दोन्ही लढतींत मुंबईकर शिवम दुबे याने मोलाचा वाटा उचलला.
IPL 2024 Shivam Dube
IPL 2024 Shivam Dube sakal

चेन्नई : गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स संघाने पहिल्या दोन लढतींत शानदार विजय मिळवत आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात अपेक्षेनुसार केली. या दोन्ही लढतींत मुंबईकर शिवम दुबे याने मोलाचा वाटा उचलला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या लढतीत त्याने नाबाद ३४ धावांची आणि गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत ५१ धावांची खेळी साकारली. याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपरकिंग्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांनी शिवम दुबेच्या दमदार फलंदाजीचे श्रेय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिले. धोनीच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे शिवम दुबे उसळत्या चेंडूंवर सक्षमपणे खेळू लागला आहे, असे हसी याप्रसंगी आवर्जून म्हणाले.

माईक हसी पुढे म्हणाले, काही वर्षांपूर्वी शिवम दुबे फलंदाजी करीत असताना त्याच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा केला जात असे. त्यावेळी अशाप्रकारचे चेंडू तो खाली वाकून डोक्यावरून जाऊन देत असे, अन्यथा अशा चेंडूंना बचावात्मक पद्धतीने खेळत असे; पण धोनीच्या मार्गदर्शनानंतर त्याच्या फलंदाजीत कमालीची सुधारणा घडून आली. शिवम दुबे यानेही कमालीची मेहनत केली. आता त्याच्या देहबोलीतून आत्मविश्‍वास झळकू लागला आहे. आता तो उसळत्या चेंडूवर चौकार व षटकारही आरामात मारतो.

दरम्यान, कर्णधार ऋतुराज गायकवाड यानेही शिवम दुबेच्या फलंदाजीचे कौतुक केले. त्यानेही संघ व्यवस्थापन व महेंद्रसिंग धोनीला याचे श्रेय दिले. तसेच संघ व्यवस्थापनाकडून कर्णधारपद भूषवताना मला मोकळीक देण्यात आली. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवण्याची इच्छा निर्माण झाली, असे तो म्हणाला.

...म्हणून धोनीची आठव्या क्रमांकावर फलंदाजी

माईक हसी यांनी या वेळी इम्पॅक्ट प्लेयर या नियमाबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, इम्पॅक्ट प्लेयर या नियमामुळे चेन्नईचा फलंदाजी विभाग आणखी भक्कम होत आहे. महेंद्रसिंग धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहे. धोनी नेटमध्ये छान फलंदाजी करीत आहे. त्यामुळे आम्हाला नव्या नियमाचा फायदा होत आहे.

IPL 2024 Shivam Dube
National Kabaddi : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा किशोरी संघ जाहीर

शुभमन गिलला १२ लाखांचा दंड

गतवर्षी उपविजेता ठरलेल्या गुजरात टायटन्सला यंदाच्या आयपीएल मोसमात मंगळवारी पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई सुपरकिंग्सकडून त्यांना हार पत्करावी लागली. या लढतीत त्यांना दुहेरी फटका बसला आहे. षटकांची गती न राखल्यामुळे कर्णधार शुभमन गिल याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुजरात संघाकडून या वर्षी पहिल्यांदाच नियमाचा भंग करण्यात आल्यामुळे गिलला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com