
'विराटचा फॉर्म जर गेला तर...'; कलंकित पाकिस्तानी बॉलरची भविष्यवाणी ठरली खरी
भारतीय फलंदाज विराट कोहलीची बॅट बर्याच काळापासून शांत झाली आहे. आयपीएल 2022 मध्येही त्याची खराब कामगिरी चालूच आहे. दरम्यान कोहलीच्या फॉर्मबाबत माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मुहम्मद आसिफचा एक जुना व्हिडिओ इंटरनेट मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कलंकित आसिफने म्हटले होता की एकदा का विराट कोहली फॉर्म गेला तर तो फॉर्ममध्ये परत येऊ शकणार नाही.(mohammad asif comments about virat kohli comeback)
हेही वाचा: SRH ला धक्का, कॅप्टन केन विल्यमसन मायदेशी परतला, काय आहे कारण?
नोव्हेंबर 2019 नंतर कोहलीने कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक केले नाही. त्याचा फॉर्म हा कायम त्याच्या चिंतेचा विषय राहिला आहे. कोहलीला आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहली शेवटच्या काही सामन्यात तीनदा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोहलीच्या खराब फॉर्मबाबत असिफचा २०२१ चा व्हिडिओ आता इंटरनेट मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने कोहलीची भविष्यवाणी केली होती.
हेही वाचा: Commonwealth Games 2022 साठी बजरंग पुनिया, रवि दहिया यांची निवड
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ त्याच्या कारकिर्दी कायम वादात सापडली आहे. फिक्सिंगचा सामना करणाऱ्या कलंकित आसिफने धक्कादायक भविष्यवाणी केले होते, आणि ती कोठे तरी खरी ठरत आहे. कलंकित मोहम्मद आसिफने आधीच टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म जाण्याचा अंदाज लावला होता. मोहम्मद आसिफ म्हणाला होता की विराट कोहली फक्त त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. एकदा का विराट कोहली फॉर्म गेला तर तो फॉर्ममध्ये परत येऊ शकणार नाही.
Web Title: Mohammad Asif Comments About Virat Kohli Batting Form Video Goes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..