CSK vs GT : मोहित - मोहम्मदचा प्रभावी मारा; चेन्नईचे मधल्या फळीतील शेर झाले ढेर

Gujarat Titans vs Chennai Super Kings, Qualifier 1
Gujarat Titans vs Chennai Super Kings, Qualifier 1esakal

Gujarat Titans vs Chennai Super Kings, Qualifier 1 : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकात 7 बाद 172 धावात रोखले. ऋतुराजच्या 60 धावांच्या जोरावर चेन्नईने दमदार सुरूवात केली होती. मात्र तो बाद झाल्यावर चेन्नईचा डाव घसरला. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी चांगला मारा करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने आपल्या संघात एक बदल केला असून यश दयालच्या जागी दर्शन नळकांडेला संधी दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्जला दर्शन नळकांडेने पहिला धक्का दिला होता. त्याने ऋतुराज गायकवाडला 2 धावांवर बाद केले होते. मात्र तो चेंडू अंपायरने नो बॉल दिला अन् ऋतुराजला जीवनदान मिळाले. त्यानंतर ऋतुराजने पुढच्याच चेंडूवर षटकार मारला. मात्र गुजरातच्या वेगवान गोलंदाजांनी विशेष करून दर्शन नळकांडेने सीएसकेच्या सलामीवीरांना हात खोलण्याची फारशी संधी दिली नाही. चेन्नईने 4 षटकात 31 धावांपर्यंत मजल मारली.

मात्र यानंतर ऋतुराज गायकवाडने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याने सीएसकेला 7 व्या षटकात 60 धावांचा टप्पा पार करून दिला होता. दुसऱ्या बाजूने डेवॉन कॉन्वे त्याला सावध फलंदाजी करत साथ देत होता.

ऋतुराज गायकवाडने पॉवर प्लेनंतर धावांची गती वाढवत सीएसकेला 10 षटकात 85 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, 37 चेंडूत ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र 44 चेंडूत 60 धावा केल्यानंतर ऋतुराजला मोहित शर्माने बाद करत चेन्नईला 87 धावांवर पहिला धक्का दिला.

ऋतुराज बाद झाल्यानंतर कॉन्वेने चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मोठे फटके मारण्यात अपयश येत होते. दरम्यान, शिवम दुबे 1 तर अजिंक्य रहाणे 17 धावा करू माघारी गेले. डेवॉन कॉन्वे देखील 34 चेंडूत 40 धावा करून बाद झाला.

यानंतर आलेल्या अंबाती रायडूने 9 चेंडूत 17 धावा चोपल्या खऱ्या मात्र त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. दरम्यान, चेन्नईने आपली दीडशतकी मजल मारली होती. मात्र शेवटची दोनच षटके राहिली असताना धोनी 1 धाव करून बाद झाला. अखेर रविंद्र जडेजाने 22 धावांचे आणि मोईन अलीने 9 धावांचे योगदान देत चेन्नईला 172 धावांपर्यंत पोहचवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com