दिवस फिरतात; भारताकडून 2 वर्ल्डकप खेळलेला खेळाडू झाला गुजरातचा नेट बॉल

Mohit Sharma Who Played Two World Cup for India now became net bowler of Gujarat titans
Mohit Sharma Who Played Two World Cup for India now became net bowler of Gujarat titans esakal

आयुष्यात चढ उतार हे होतच असतात. खेळाडूंच्या आयुष्यात देखील असे चढ उतार कायम येत असतात. मात्र एखादा खेळाडू देशाकडून खेळल्यानंतर देखील त्याला एका आयपीएल (IPL) फ्रेंचायजीच्या संघातील नेट बॉल होण्याची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. मात्र अशी वेळ भारताकडून 2014 चा टी 20 आणि 2015 चा वनडे वर्ल्डकप (World Cup 2015) खेळलेल्या मोहित शर्मावर (Mohit Sharma) आली आहे. त्याला गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) नेट बॉल ( म्हणून संघात सामावून घेतल्याचे सांगितले. याला गुजरात टायटन्सचा गोलंदाज गुरकीरतने देखील दुजोरा दिला आहे.

Mohit Sharma Who Played Two World Cup for India now became net bowler of Gujarat titans
कठीण काळात रवी शास्त्रींनी मला साथ दिली : सिराज

मुळचा हरियाणाचा असलेल्या मोहित शर्मा कधी काळी चेन्नई सुपर किंग्जचा हुकमी एक्का होता. कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) देखील त्याच्याकडे मोठ्या आत्मविश्वासाने चेंडू सोपवायचा. अनेक अडचणीतले सामने मोहित शर्माने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकून दिले आहेत. चेन्नईकडून (CSK) खेळताना मोहित पर्पल कॅपचा मानकरी देखील ठरला होता. यामुळेच त्याची भारतीय संघात देखील वर्णी लागली होती. मात्र जेव्हा चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) सट्टेबाजीप्रकरणी दोन वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले त्यानंतर मोहित शर्माच्या कारकिर्दिला देखील ग्रहण लागायला सुरूवात झाली. चेन्नईवर बंदी आल्यानंतर मोहित शर्मा पंजाब किंग्जकडून खेळला. मात्र त्याची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही.

Mohit Sharma Who Played Two World Cup for India now became net bowler of Gujarat titans
ग्लेन मॅक्सवेलचे दोन वर्षापासून तटलले लग्न अखेर झाले संपन्न

पंजाबमधील खराब कामगिरीनंतर मोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतला. मात्र नव्या दमाच्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये या अनुभवी गोलंदाजाला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. तो चेन्नईकडून फक्त एक सामना खेळला. त्यात त्याने 27 धावात 1 विकेट घेतली. 2020 च्या आयपीएल हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडे सरकला. तेथेही त्याच्या नशिबात फक्त 1 सामना आला. त्या सामन्यात त्याने 45 धावा देत 1 विकेट घेतली.

Mohit Sharma Who Played Two World Cup for India now became net bowler of Gujarat titans
Video: ऑकलँडमध्ये चर्चा फक्त वस्त्रकारच्या 'त्या' षटकाराचीच

त्यानंतर मोहित शर्मा 2022 मध्ये पुन्हा आयपीएल लिलावाच्या रिंगणात उतरला मात्र यावेळी तो अनसोल्ड राहिला. नुकताच मोहितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवरून एक फोटो शेअर केला. यात मोहित बरिंदर सरन आणि गुरकीरत सिंग मान यांच्यासोबत होळी साजरी करतानाचा दिसत आहे. गुरकीरत मान यंदा गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. त्याने गुजरात टायटन्सने मोहित शर्मा, बरिंदर सरन आणि लुकमन मेरिवाला यांना नेट बॉलर म्हणून निवडल्याच्या बातमीला दुसरा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com