LSG vs CSK IPL 2024 : धोनीचे मैदानात येणे 'कानांसाठी' खतरनाक; मॅच संपल्यानंतर मिळाली मोठी वॉर्निंग

MS Dhoni arrival Noise Alert In Lucknow De Kock Wife Instagram Story : यंदाच्या आयपीएल हंगामात जेव्हा जेव्हा महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करण्यासाठी मैदानात येतो तेव्हा तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित हजारो चाहते एकाच वेळी धोनी-धोनी नावाच्या घोषणा देऊ लागतात.
MS Dhoni arrival Noise Alert In Lucknow De Kock Wife Instagram Story
MS Dhoni arrival Noise Alert In Lucknow De Kock Wife Instagram Storysakal

MS Dhoni arrival and De Kock Wife Instagram Story : यंदाच्या आयपीएल हंगामात जेव्हा जेव्हा महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करण्यासाठी मैदानात येतो तेव्हा तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित हजारो चाहते एकाच वेळी धोनी-धोनी नावाच्या घोषणा देऊ लागतात. कोलकाताविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनी फलंदाजीसाठी मैदानात येत असताना स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलला आवाज ऐकून आपले कान झाकून घ्यावे लागले होते. आता लखनऊविरुद्धच्या सामन्यादरम्यानही धोनी आल्यावर असेच काहीसे पाहायला मिळाले. आणि मोठा इशारा देण्यात आला आहे.

MS Dhoni arrival Noise Alert In Lucknow De Kock Wife Instagram Story
IPL 2024 Playoffs Scenario : अर्धी आयपीएल संपली! तळातल्या संघांना प्लेऑफसाठी करावे लागणार करेक्ट नियोजन, जाणून घ्या 10 संघांचे समीकरण

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध महेंद्रसिंग धोनीने 311.11 च्या स्ट्राईक रेटने नऊ चेंडूत 28 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले आणि चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.

90 धावांत पाच विकेट्स गमावल्यानंतर सीएसके एकवेळ अडचणीत सापडलेले दिसत होते. यानंतर रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी 51 धावांची भागीदारी केली आणि अखेर जडेजाने धोनीसोबत 35 धावांची भागीदारी करून चेन्नई संघाला 20 षटकात 176 धावांपर्यंत मजल मारली.

MS Dhoni arrival Noise Alert In Lucknow De Kock Wife Instagram Story
KL Rahul Breaks MS Dhoni Record : केएल राहुलनं धोनीच्या साक्षीने मोडला 'थाला'वाला विक्रम! बनला IPL चा नंबर 1 विकेटकीपर

हा सामना लखनौमध्ये खेळला गेला असला तरी सीएसके आणि विशेषत: धोनीला स्टेडियममध्ये खूप पाठिंबा होता. चाहते सीएसकेचे झेंडे आणि जर्सी घालून एकना स्टेडियमवर आले होते. यादरम्यान लखनौचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉकची पत्नी साशाही स्टेडियममध्ये उपस्थित होती.

या सामन्यादरम्यान तिने असे काही अनुभवले जे यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते. खरं तर, मोईन अली आऊट झाल्यानंतर धोनी जेव्हा ड्रेसिंग रूममधून फलंदाजीसाठी बाहेर आला तेव्हा चाहत्यांनी त्याच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीने ड्रेसिंग रुममधून बाहेर पडून क्रीजवर जाईपर्यंत सर्व डेसिबल रेकॉर्ड मोडले आहेत.

MS Dhoni arrival Noise Alert In Lucknow De Kock Wife Instagram Story
IPL 2024 DC vs SRH : आज पडणार षटकार-चौकारांचा पाऊस! प्रदीर्घ कालावधीनंतर घरच्या मैदानावर खेळणार पंत

त्यावेळी क्विंटन डी कॉकची पत्नीने घातलेल्या स्मार्टवॉचवर एक वॉर्निंग आली की आवाज खूप जास्त आहे, त्यामुळे कानांना धोका होऊ शकतो. डी कॉकच्या पत्नीने सामन्यानंतर सांगितले की, धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा स्टेडियममध्ये खूप गोंगाट झाला होता, जर हा आवाज 10 मिनिटे ऐकू आला तर कानाला इजा होऊ शकते. आणि घड्याळावर वारंवार इशारे दिले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com