esakal | IPL 2021: माही भाई लाजवाब! 'कॅप्टन कूल' धोनीचं अनोखं शतक | MS Dhoni
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

धोनीने SRH विरूद्ध केली धडाकेबाज कामगिरी

IPL 2021: माही भाई लाजवाब! 'कॅप्टन कूल' धोनीचं अनोखं शतक

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 CSK vs SRH: हैदराबादविरूद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत धोनीचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्यापासूनच चेन्नईच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. या सामन्यात वृद्धिमान साहा जेव्हा बाद झाला, तेव्हा कॅप्टन कूल धोनीच्या नावावर आणखी एका पराक्रमाची नोंद झाली.

हेही वाचा: धोनी 'टीम इंडिया'मध्ये आला अन् मला संघात संधी मिळणं बंद झालं!

हैदराबादचा सलामीवीर जेसन रॉय २ धावांवर बाद झाला. पाठोपाठ कर्णधार विल्यमसनदेखील ११ धावांवर माघारी परतला. या दोन गड्यांच्या बाद होण्याने हैदराबादची धावगती मर्यादित राहिली. हैदराबादचा तरणाबांड खेळाडू प्रियम गर्गही ७ धावा काढून माघारी परतला. वृद्धिमान साहाने मात्र एक बाजू लावून धरली. धावगती वाढवण्यासाठी त्याने जाडेजाच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या बॅटला लागून चेंडू उंच उडाला आणि धोनीने त्याला झेल टिपला. या कॅचसह धोनीने CSK कडून विकेटकिपर म्हणून खेळताना आपले १०० झेल पूर्ण केले.

loading image
go to top