esakal | IPL 2021: पुढच्या वर्षी CSK कडून खेळेन की नाही सांगू शकत नाही- धोनी
sakal

बोलून बातमी शोधा

MS-Dhoni-CSK-Sad

चेन्नईच्या महेंद्रसिंग धोनीचं मोठं विधान

पुढच्या वर्षी CSK कडून खेळेन की नाही सांगू शकत नाही- धोनी

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 CSK vs PBKS: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या CSK ला पंजाबने पराभूत केले. कर्णधार लोकेश राहुल याच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईवर अवघ्या १३ षटकात विजय मिळवला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुलने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावा केल्या. पंजाबने या विजयासह १२ गुणांसह आपल्या नेट रनरेटमध्ये सुधारणा केली आणि प्ले ऑफ्ससाठीचे आव्हाना जिवंत ठेवले. मात्र, या सामन्यादरम्यान धोनीने एक मोठं वक्तव्य केलं.

धोनी मैदानावर नाणेफेकीसाठी आला असता अँकर डॅनी मॉरिसनने त्याला भविष्यातील योजनांबद्दल विचारलं. त्याबाद्दल बोलताना धोनीने एक मोठं आणि सूचक वक्तव्य केलं. "पुढच्या हंगामात मी पिळव्या रंगाच्या जर्सीमध्य मी नक्कीच दिसेन पण मी चेन्नईच्या संघाकडून खेळत असेन की नाही ते मात्र मला आताच सांगणं कठीण आहे. मधल्या काळात अनेक अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. दोन नवीन संघ IPL मध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे नव्या संघांचा विचार करता आता अस्तित्वात असलेल्या संघांना किती खेळाडू स्वत:कडे राखून ठेवता येणार आहे याची नियमावली माहिती नाही. आणखीही काही गोष्टी अद्याप स्पष्ट नाहीत", असं सूचक वक्तव्य धोनीने केलं.

ऐका, नक्की काय म्हणाला धोनी...

loading image
go to top