MS Dhoni Surgery : MS धोनीची गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, IPL च्या पुढच्या हंगामात करणार धमाका?

महेंद्रसिंग धोनीच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट
 ms dhoni-underwent-successful-knee-surgery-today-at-kokilaben-hospital ms dhoni latest-updates cricket news in marathi
ms dhoni-underwent-successful-knee-surgery-today-at-kokilaben-hospital ms dhoni latest-updates cricket news in marathi

MS Dhoni Surgery : आयपीएल 2023ला चेन्नई सुपर किंग्जच्या रूपाने नवा चॅम्पियन मिळाला आहे. या ग्रँड लीगच्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभव केला. मात्र या विजयानंतर आता चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार चाहत्यांचा लाडका महेंद्रसिंग धोनी याच्या गुडघ्यावर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

 ms dhoni-underwent-successful-knee-surgery-today-at-kokilaben-hospital ms dhoni latest-updates cricket news in marathi
IND vs AUS: WTC फायनलमध्ये हा खेळाडू रोहितसोबत करणार ओपनिंग! शुभमन गिलचा पत्ता कट?

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. धोनीची ही शस्त्रक्रिया मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात झाली. धोनीच्या गुडघ्याचे ऑपरेशन डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी केले. कार अपघातानंतर ऋषभ पंत आणि भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे नीरज चोप्रा यांचे ऑपरेशन करणारे हेच डॉक्टर आहेत.

 ms dhoni-underwent-successful-knee-surgery-today-at-kokilaben-hospital ms dhoni latest-updates cricket news in marathi
Asia Cup 2023 BCCI vs PCB : इस में तेरा घाटा... बीसीसीआय पाकिस्तानला देणार जोरदार झटका

आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना महेंद्रसिंग धोनीला दुखापत झाली होती. या सामन्याच्या 19व्या षटकात दीपक चहरच्या बाहेर जाणारा चेंडू रोखण्यासाठी धोनीने डाईव्ह मारली. डाईव्हनंतरच धोनी वेदनेत दिसला. जरी त्याने विकेटकीपिंग सोडले नाही. त्याचवेळी या सामन्यानंतर धोनी संपूर्ण हंगामात गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजताना दिसला.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या विजेतेपदानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी म्हणाला होता की, चाहत्यांनी माझ्यावर ज्याप्रकारे प्रेमाचा वर्षाव केला आहे, त्यामुळे मी आणखी एक सीझन खेळणे हीच त्यांना माझी भेट असेल फक्त शरीराने साथ द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com