IPL 2023: दुसऱ्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित आला रडकुंडीला, 'या' खेळाडूंवर संतापून कर्णधार म्हणाला...

पॉवरप्लेमध्ये एका विकेट 61 धावा तरी मुंबईचा संघ 8 बाद 157 धावाच करू शकला त्यामुळे...
Mumbai Indians Captain Rohit Sharma
Mumbai Indians Captain Rohit Sharma

Mumbai Indians Captain Rohit Sharma : आयपीएल 2023च्या 12व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाला केवळ 157 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात CSK ने 18.1 षटकात 3 गडी गमावून सहज लक्ष्याचा पाठलाग केला. या मोसमात मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले.

Mumbai Indians Captain Rohit Sharma
MI vs CSK IPL 2023 : मुंबईची होम ग्राऊंडवरही पाटी कोरीच! CSK ने घरात घुसून केला पराभव

आयपीएलचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर त्याला आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना जबाबदारी पार पाडावी लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल, असा विश्वास मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला आहे. रोहित, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. शनिवारी चेन्नईविरुद्ध संघाला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

Mumbai Indians Captain Rohit Sharma
MI vs CSK IPL 2023 : मुंबईचा सलग दुसरा पराभव; चेन्नईने 7 विकेट्स राखून केला पराभव

रोहितने सामन्यानंतर सांगितले की, माझ्यासह इतर अनुभवी खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारून फलंदाजीने अधिक धावा करण्याची गरज आहे. आयपीएलची पद्धत आम्हाला माहीत आहे. आम्हाला थोडी लय मिळणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही तसे केले नाही तर संघासाठी कठीण होईल. रोहितने आपल्या फलंदाजांना वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

तो पुढे बोलताना म्हणाला की, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करून पाहण्याची गरज आहे, आक्रमण आणि धैर्य दाखवण्याची गरज आहे. आयपीएलमध्ये तरुण असलेले काही खेळाडू आपल्याकडे आहेत. त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. यास वेळ लागेल, परंतु आपण त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. पॉवरप्लेमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात 61 धावा करूनही मुंबईचा संघ 8 बाद 157 धावाच करू शकला. संघाने 40 धावा कमी केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com