IPL 2023 : मुंबई इंडियन्सला मिळाला नवीन 'कर्णधार'! रोहित शर्मा बाहेर

अर्जुन तेंडुलकरने केले पदार्पण तर रोहित शर्मा बाहेर
IPL 2023 Mumbai Indians Rohit Sharma
IPL 2023 Mumbai Indians Rohit Sharma
Updated on

IPL 2023 Mumbai Indians : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळल्या जात आहे. या सामन्यासाठी नाणेफेक झाली, त्यानंतर दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. आजच्या सामन्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे रोहित शर्मा खेळत नाहीये. तिथेच अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केले आहे.

IPL 2023 Mumbai Indians Rohit Sharma
IPL 2023 : विराट अन् गांगुलीचे भांडण आले सर्वांसमोर; VIDEO वरून क्रिकेट विश्वात खळबळ

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्माच्या पोटात दुखत आहे. मात्र नाणेफेक जिंकली असती तर काय केले असते, असा प्रश्न नितीश राणाला विचारला असता, त्यांनी प्रथम फलंदाजी करणार असल्याचे सांगितले. एकूणच मुंबईविरुद्ध केकेआरचा कर्णधार आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता.

IPL 2023 Mumbai Indians Rohit Sharma
IPL 2023: सामन्याच्या काही तास आधी रोहितच्या मुंबई इंडियन्सने केली मोठी घोषणा!

कोलकाता नाइट रायडर्सने प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणताही बदल केलेला नाही. मुंबईत अर्जुन तेंडुलकरची प्रतीक्षा संपली आहे. तो आज आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. रोहित शर्माच्या जागी अर्जुन संघात आला आहे. त्याच्या मुंबईने ड्वेन जॉन्सनचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

IPL 2023 Mumbai Indians Rohit Sharma
IPL 2023 : पृथ्वी शॉ पुढील सामन्यातून बाहेर? कर्णधार डेव्हिड वॉर्नर रागात म्हणाला...

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन अशी आहे

  • मुंबई इंडियन्स: इशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पियुष चावला, रिले मेरेडिथ, ड्वेन जॉन्सन

  • कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज, नारायण जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com