
IPL 2022 : आता मुंबई इंडियन्स देखील 'कमिन्स मार्गा'वर चालणार
मुंबई : मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या यंदाच्या हंगामात (IPL 2022) सलग तिसरा पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईचा पाच विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने (Pat Cummins) तुफान फटकेबाजी करत 15 चेंडूत 56 धावा केल्या होत्या. कमिन्सच्या या खेळीमुळे केकेआरने सामना 16 व्या षटकातच जिंकला. दरम्यान, या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक(Mumbai Indians Coach) महेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) आपली प्रतिक्रिया दिली. यात तो आयपीएल पाच वेळा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला आता सामना संपवण्यासाठी कमिन्स सारखा पवित्रा घ्यावा लागणार आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, केकेआर विरुद्धच्या पराभवानंतर संघाचे प्रशिक्षक जयवर्धनेने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की, 'आम्ही संपूर्ण सामन्यावर आमची पकत राखण्यात यश मिळवतो. मात्र काही सामन्यात अटीतटीच्या सामन्यात आम्हाला जिंकण्यासाठी आता निर्दयी पवित्रा घ्यावा लागणार आहे. हा पवित्रा घेण्यात आम्हाला अपयश येत आहे. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. मात्र सामना आमच्या बाजूने संपवण्यात कमी पडत आहोत. आम्हाला तीनही सामन्यात जिंकण्याची संधी होती मात्र आम्ही सामना संपवू शकलो नाही.'
जयवर्धने पुढे म्हणाला की, 'ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. गोलंदाजीत आम्ही शेवटच्या षटकात आणि दबावाच्या वेळी हवी तशी कामगिरी करू शकत नाहीये. आम्ही आमची रणनिती मैदानात उतरवण्यात अपयशी ठरत आहोत. आम्हाला यात सुधारणा करावी लागणार आहे. सध्याच्या घडीला पॅट कमिन्स हा जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज म्हणून गणला जातो. त्याने मुंबई विरूद्धच्या सामन्यात 14 चेंडूत अर्धशतक ठोकून आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या केएल राहुलच्या विक्रमाशी बरोबर केली. त्याच्या या खेळीमुळे केकेआरने मुंबईवर सहज विजय मिळवला. याबाबत जयवर्धनेने मान्य केले की आम्ही कमिन्सला चांगल्या लेंथवर गोलंदाजी करू शकलो नाही. लेग साईडची बाऊंड्री छोटी होती. कमिन्सने याचाच फायदा उचलत स्लॉग स्वीप मारले.