MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Mumbai Indians playoffs qualification scenario : आयपीएल 2024 च्या 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चमकदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला.
Mumbai Indians playoffs qualification scenario
Mumbai Indians playoffs qualification scenariosakal

Mumbai Indians playoffs qualification scenario : आयपीएल 2024 च्या 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चमकदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयात मोठे योगदान सूर्यकुमार यादवचे होते ज्याने आपल्या शतकी खेळीने सामना फिरवला. मुंबई इंडियन्सचा हा स्पर्धेतील चौथा विजय आहे.

8 सामने गमावूनही मुंबई अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मुंबई अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही. समजावून घेऊया संपूर्ण समीकरण....

Mumbai Indians playoffs qualification scenario
MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी मुंबईला प्रथम पुढील दोन सामने जिंकावे लागतील. त्यानंतर मुंबई एकूण 6 सामने जिंकले. आणि 6 विजयांसह मुंबई प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी पात्र ठरू शकते. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी 8-8 सामने जिंकले आहेत. या समीकरणानुसार हे दोन्ही संघ आधीच पात्र ठरतील.

आयपीएल 2024 चा 57 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. यामध्ये कोणताही संघ हा सामना जिंकेल, तो या आयपीएल हंगामातील 7 वा सामना जिंकेल. अशा परिस्थितीत सात विजयांसह लखनौ किंवा हैदराबाद यांच्यामधील कोणता तरी एक संघ पात्र ठरेल. एक पद अजूनही रिक्त आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवली जाईल की इतर कोणताही संघ 7 सामने जिंकू शकणार नाही.

Mumbai Indians playoffs qualification scenario
Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये किंवा बाहेर नेण्यात चेन्नई सुपर किंग्जचे सर्वात मोठे योगदान असणार आहे. सीएसकेने या हंगामात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सीएसकेने आता एक तरी सामना जिंकला तर मुंबईचा पत्ता कट होऊ शकतो. अशा स्थितीत मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सीएसकेला तिन्ही सामने गमवावे लागतील.

याशिवाय एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की उद्या हैदराबाद आणि लखनौ यांच्यात पराभूत झालेल्या संघाने नंतर एकही सामना जिंकला तरी तो मुंबईच्या पुढे जाईल. त्यामुळे मुंबई नशिबाची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com