esakal | IPL 2021: मुंबईला 'प्ले ऑफ्स'चं तिकीट हवं असेल तर हे आहे समीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Pollard-Mumbai-Indians

मुंबईच्या संघाचा आज हैदराबाद विरूद्ध सामना

मुंबईला 'प्ले ऑफ्स'चं तिकीट हवं असेल तर 'हे' आहे समीकरण

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Mumbai Indians Playoffs Equation: कोलकाता संघाने गुरूवारी राजस्थानविरूद्धच्या सामन्यात तब्बल ८६ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने Top 4 मध्ये स्थान पटकावले. कोलकाताने शेवटचा साखळी सामना जिंकत १४ सामन्यात १४ गुणांसह आणि तगड्या नेट रनरेटसह चौथं स्थान गाठलं. त्यामुळे आता मुंबईच्या संघाला जर 'प्ले-ऑफ्स'ची फेरी गाठायची असेल, तर शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईला भल्या मोठ्या फरकाने सनरायजर्स हैदाराबादच्या संघाला पराभूत करावेच लागेल.

हेही वाचा: IPL 2021: 'मुंबई इंडियन्स'ची पहिल्या टप्प्यात काय केलं? वाचा..

पाहा काय आहे मुंबई इंडियन्सचं 'प्ले-ऑफ्स'साठीचं समीकरण

- सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या कोलकाताचा संघ गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट +०.५८७ इतका आहे. तर मुंबईचे १३ सामन्यात १२ गुण असून त्यांचा नेट रनरेट -०.०४८ आहे.

- मुंबईच्या संघाला प्ले ऑफ्सचं तिकीट मिळवायचं असेल तर त्यांना हैदराबाद विरूद्धचा सामना २००पेक्षा अधिक धावा काढून सुमारे १७१ धावांनी जिंकावा लागेल.

- पण, हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी घेतली, तर मुंबईचा पत्ता त्याच वेळी कट होईल. कारण त्या परिस्थितीत मुंबईच्या संघाला कितीही मोठं लक्ष्य असलं तरीही पहिल्याच षटकात गाठावं लागेल.

loading image
go to top