esakal | IPL 2021: मुंबई इंडियन्सला 'या' संघापासून आहे सर्वाधिक धोका! | Mumbai Indians
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma-Mumbai-Indians

'हिटमॅन'च्या स्वप्नांना टीम इंडियाचा सहकारीच लावू शकतो सुरूंग

IPL 2021: मुंबई इंडियन्सला 'या' संघापासून आहे सर्वाधिक धोका!

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 MI vs DC: मुंबई इंडियन्स संघाचा आज दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध सामना असून तो सामना जिंकणं मुंबईसाठी अत्यंत आवश्यक आहे. दिल्लीच्या संघाने प्ले-ऑफ्समध्ये आधीच प्रवेश केलेला आहे. पण मुंबईच्या संघाला उर्वरित सर्व सामने जिंकणं अनिवार्य आहे. मुंबईने पुढील सर्व सामने जिंकले तर त्यांना फारशी चिंता करण्याची गरज भासणार नाही. पण मुंबईने एखादा सामना गमावला तर त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहण्याची गरज भासेल. अशा वेळी मुंबईला सर्वाधिक धोका असेल पंजाब किंग्स संघाचा आणि केएल राहुलच्या दमदार फॉर्मचा...

हेही वाचा: IPL Points Table : पंजाब जिंकलं अन् दिल्ली प्ले ऑफमध्ये पोहचलं

हेही वाचा: DK चा उलटा-सुलटा फटका; खळी पडणाऱ्या गालावर फुललं हास्य (VIDEO)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने २०१९ आणि २०२० या दोन वर्षी सलग IPL चे विजेतेपद मिळवले आहे. यंदाच्या वर्षी विजेतेपद मिळवून हॅटट्रिक साधण्याचा विक्रम करण्याची संधी रोहितला आहे. अशा वेळी प्ले-ऑफ्सची फेरी गाठणे हा रोहितच्या मुंबई इंडियन्स समोरचा पहिला टप्पा आहे. सध्या पंजाब संघाची लय पाहता ते पुढील सर्व सामन्यात कमाल करू शकतात असं बोललं जात आहे. गेल्या काही सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत गेलेला हातताल सामना पंजाबने या आधी गमावला आहे. पण काल कोलकाता संघाचा शेवटच्या षटकात पराभव करत पंजाब संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यामुळे मुंबईने आपले सर्वच्या सर्व सामने जिंकून आपलं स्थान प्ले-ऑफ्समध्ये पक्क करावं असा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे.

loading image
go to top