
मुंबईने नवा विकेटकिपर शोधला; टायमल मिल्स आयपीएल मधून बाहेर
IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स (Tymal Mills) इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2022) बाहेर पडला आहे. त्याच्या घोट्याला दुखापत झाल्याने तो आयपीएलच्या उर्वरित हंगामाला मुकणार आहे. त्याच्या जागी (Replacement) मुंबई इंडियन्सने ट्रिस्टन स्टब्सला (Tristan Stubbs) संघात घेतले आहे.
हेही वाचा: DC vs SRH Live : डेव्हिड वॉर्नर हैदराबादला एकटा भिडलाय
मिल्सच्या जागेवर आलेला ट्रिस्टन स्टब्स हा दक्षिण आफ्रिकेचा 21 वर्षाचा विकेट किपर आहे. त्याने आतापर्यंत 17 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 506 धावा केल्या असून यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचे स्ट्राईक रेट देखील 157.14 असे प्रभावी आहे. मुंबईने त्याला बेस प्राईस 20 लाखाला खरेदी केले आहे.
हेही वाचा: Rishabh Pant : बाबा जरा जबाबदारीनं खेळ; सेहवागचा पंतला सल्ला
मुंबई इंडियन्सने सलग आठ पराभवानंतर हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. त्यांनी 30 एप्रिलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पाच विकेट्सनी पराभव केला. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या हंगामात साखळी फेरी संपण्याआधीच प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर जाण्याची वेळ आली आहे.
Web Title: Mumbai Indians Tymal Mills Ruled Out Ipl 2022 Tristan Stubbs Replaced
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..