MI vs GT : अखेर मुंबई इंडियन्सने 27 धावांनी मिळवला विजय, राशिदची झुंज गेली व्यर्थ

MI vs GT
MI vs GTesakal

Mumbai Indians vs Gujarat Titans : मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेल्या 219 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची अवस्था 8 बाद 103 धाव झाली होती होती. मुंबई हा सामना किमान शंभर धावांनी जिंकणार असे वाटत होते. मात्र गुजरातच्या राशिद खानने झुंजारपणा काय असतो हे आजच्या सामन्यात दाखवले. त्याने एकट्याने 32 चेंडूत 79 धावा चोपल्या. अखेर मुंबईने सामना 27 धावांनी जिंकला मात्र मुंबईच्या विजयाला राशिदचे गालबोट लागलेच.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून वानखेडेवर मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडले. मात्र मुंबईने दमदार सुरूवात करत गुजरातच्या रणनितीला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र राशिद खानने आपला जलवा दाखवत मुंबईला पाठोपाठ तीन धक्के दिले होते.

अखेर मुंबईचा सूर्या मैदानात आला आणि त्याने वानखेडे हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. त्याने एकहाती किल्ला लढवत 49 चेंडूत शतकी तडाखा दिला. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 20 षटकात 5 बाद 218 धावांपर्यंत पोहचवले. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. सूर्याचे हे आयपीएलमधील पहिले शतक ठरले. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

वानखेडेवर सूर्याचाच जलवा चालतो

17 व्या षटकात 47 धावांपर्यंत पोहचलेल्या सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याने 18 व्या षटकात 20, 19 व्या षटकात 17, तर 20 व्या षटकात 17 धावा चोपल्या. मुंबईने केलेल्या 54 धावात कॅमरून ग्रीनच्या फक्त 3 धावांचा वाटा होता.

सूर्याने 49 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. सूर्याचे हे आयपीएलमधील पहिले वहिले शतक आहे. मुंबई सध्या करो या मरो स्थितीत आहे. अशा परिस्थितीत सूर्याने शतकी खेळी केली.

88-3 (9 Ov) : दमदार सुरूवातीनंतर मुंबई ढेपाळली. 

मुंबई इंडियन्सने 6 षटकात 10 च्या सरासरीने 61 धावा केल्यानंतर त्यांचा डाव गडगडला. राशिद खानने रोहित शर्माला 29 धावांवर बाद केले. त्यानंतर इशान किशनची 20 चेंडूतील 31 धावांची खेळी खेळी देखील संपवली. यानंतर नेहल वधेराला 15 धावांवर बाद करत मुंबईची अवस्था 3 बाद 88 अशी केली.

MI 61/0 (6)  रोहित शर्मा, इशान किशनची अर्धशतकी सलामी

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात केली. गेल्या काही सामन्यापासून दुहेरी आकडाही न गाठू शकणाऱ्या रोहित शर्माने अखेर आपला जुना खेळ दाखवण्यास सुरूवात केली. इशान किशन आणि रोहित शर्माने चौथ्या पाचव्या षटकातच मुंबईला अर्धशतकी मजल मारून दिली. मुंबईने 6 षटकात बिनबाद 61 धावांपर्यंत मजल मारली.

गुजरातने नाणेफेक जिंकली

गुजरात टायटन्सने मुंबईविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com