
'कॅप्टन तुमच्या घरचा शिपाई नाही' कोलकाताच्या कोचवर भडकला PAK क्रिकेटर
कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमवर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने टीका केली आहे. बट्ट म्हणाला की, ब्रेंडन मॅक्युलम खेळाडूंना निडर क्रिकेट खेळण्याच्या कारणामुळे बेकार क्रिकेट खेळण्यासाठी प्रवृत्ती करत आहे. मॅक्क्युलमची एकच इच्छा आहे की प्रत्येक खेळाडूंनी कोणत्याही परिस्थितीत केवळ आक्रमण क्रिकेट खेळावे.
सलमान बट्ट त्यांच्या यूट्यूब शो वर बोलताना म्हणाला, मॅक्युलमचा काय विषय आहेत का? खेळायचा त्याला फक्त एकच मार्ग दिसतो आहे का? खेळपट्टी कशी आहे? ठिकाण कोणतं आहे? विरोधी संघाला किती स्कोअर द्यायचा या सर्व गोष्टी त्याला दिसत नाहीत का? का फक्त खेळाडूंना सांगायचं जा आणि मुक्तपणे खेळा, पटकन धावा करा. त्यामुळे मॅक्युलम कधी कधी खेळाडूंना बेधडक क्रिकेटच्या नावाखाली खराब क्रिकेट खेळायला सांगतो.
हेही वाचा: क्रिकेटचा 'गब्बर' सिनेमाच्या पडद्यावर; शिखर धवनचं बॉलीवूडमध्ये पदार्पण
श्रेयस अय्यर आणि केकेआरचे सीईओच्या कृत्याला उत्तर देताना, बट्ट म्हणाला तुम्ही तुमच्या संघाला थोड मोकळ सोडलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या संघाचा कर्णधार बनवता त्याला चुका करायची सूट असते. कॅप्टन तुमच्या घरचा शिपाई नाही, जो तुमच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करेल.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये बट्टने लाहौर कलंदर्स टीम चे नेतृत्व केले होते. त्या वेळेस मॅक्क्युलम त्याच्या टीमचा कोच कार्यकारभार पाहात होता. त्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखे आहे की मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली लाहौर कलंदर्स 2017 आणि 2018 च्या हंगामात गुणतालिकेत खालच्या स्तानावर होता.
हेही वाचा: 'मी केवळ 24 वर्षाचा' ऋषभ पंत असे का म्हणाला?
बट्ट म्हणाला लाहौर कलंदर्समध्ये मी खूप काही पाहिलं आहे. मॅक्युलमचे बेधडक क्रिकेट म्हणजे मन एका बाजूला खेळत राहणे आणि मागे वळून न पाहता फटकेबाजी करणे. जर 15 षटके शिल्लक असताना तुम्ही 10 पैकी 7 विकेट गमावल्या असतील, तर संघाने आक्रमक खेळ करावा असे त्याला वाटत असते. लाहौर संघाने त्याला अनेक संधी दिल्या पण त्याची पद्धत काही कामी आली नाही.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील आणि ब्रेंडन मॅक्युलमचे प्रशिक्षक असलेले कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झालेला मॅक्युलम या हंगामाच्या समाप्तीनंतर केकेआरच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होऊ शकतो.
Web Title: Pakistani Captain Salman Butt Kkr Head Coach Brendon Mccullum Ipl 2022 Kkr
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..