KKR vs LSG : तोमरनं डिकॉकला जीवनदान दिलं, IPL च्या इतिहासात जे घडलं नाही ते घडलं | Quinton de Kock KL Rahul Create History | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Quinton de Kock KL Rahul Create History

तोमरनं डिकॉकला जीवनदान दिलं, IPL च्या इतिहासात जे घडलं नाही ते घडलं

आयपीएलच्या 66 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंटनं (Lucknow Super Giants) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) आणि केएल राहुलने (KL Rahul) भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र सामन्याच्या तिसऱ्या षटकात उमेश यादवने क्विंटन डिकॉकला बाद केलेच होते. मात्र अभिजीत तोमरने (Abhijeet Tomar) झेल सोडला आणि पुढे क्विंटन डिकॉकने इतिहास रचला. (Quinton de Kock KL Rahul Create History)

हेही वाचा: थॉमस कपचा गाजावाजा मात्र कर्णबधीर बॅडमिंटनपटू अनिकानेही रचला इतिहास

क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल यांनी आधी अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर आक्रमक झालेल्या डिकॉकने ही सलामी शतकापर्यंत नेली. मात्र यानंतर देखील डिकॉकने मागे वळून पाहिले नाही. त्याने शतकी मजल मारत संघाला 150 चा टप्पा पार करून दिला. बघता बघता स्लॉग ओव्हर आल्या तेथीही केकेआरच्या गोलंदाजांना ही जोडी फोडता आली नाही. या जोडीने शेवटच्या पाच षटकात 71 धावा चोपल्या आणि सलामी जोडीनेच 20 षटकात 210 धावांचा टप्पा पार केला. या नाबाद सलामीने आयपीएलमध्ये अनेक विक्रम (IPL Records) प्रस्थापित केले.

हेही वाचा: पाकव्याप्त काश्मीरमधील लीग खेळण्यासाठी विराट कोहलीला निमंत्रण?

1 - आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी सलामी भागीदारी. यापूर्वी जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरने 185 धावांची सलामी दिली होती.

2 - आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी सलामी भागीदारी : यापूर्वी जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरने 2019 च्या हंगामात 185 धावांची सलामी दिली होती. तर 2017 मध्ये गौतम गंभीर आणि ख्रिस लिनने नाबाद 184 धावांची सलामी दिली होती. आता 2022 मध्ये क्विंटन डिकॉकने 210 धावांची नाबाद सलामी देत सर्व रेकॉर्ड मोडले.

3 - केकेआर विरूद्ध कोणत्याही विकेटसाठी केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली.

4 - क्विंटन डिकॉकच्या कारकिर्दितील सर्वात मोठी 140 धावांची खेळी

5 - क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल ही आयपीएल इतिहासातील पूर्ण 20 षटके खेळणारी पहिली सलामी जोडी ठरली.

6 - आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 200 पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी झाली.

7 - आयपीएल 2022 मधला सर्वात मोठ्या वैयक्तिक धावा, यापूर्वी जॉस बटलरने 116 धावा केल्या होत्या.

8 - केएल राहुलने सलग पाचव्या हंगामात 500 पेक्षा जास्त धावा केल्या. केएल राहुलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत 537 धावा झाल्या आहेत.

9 - क्विंटन डिकॉकचे आयपीएल कारकिर्दितील शंभर षटकार पूर्ण झाले. यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत 22 षटकार मारले आहेत.

10 - आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले की एका संघांने एकही विकेट गमावली नाही.

11 - डिकॉक आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खेळी करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला. यापूर्वी ख्रिस गेलने नाबाद 175 धावा केल्या होत्या तर मॅक्युलमने 158 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर डिकॉकच्या नाबाद 140 धावांच्या खेळीचा नंबर लागतो.

Web Title: Quinton De Kock Kl Rahul Create Many Ipl Records By Giving 210 Not Out Opening Partnership

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top