esakal | IPL 2021: राजस्थानच्या फलंदाजांनी केलं निराश; ओढवली नामुष्की | Rajasthan Royals
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan-Batting-Failure

राजस्थानच्या संघाचा मुंबई इंडियन्सने उडवला धुव्वा

IPL 2021: राजस्थानच्या फलंदाजांनी केलं निराश; ओढवली नामुष्की

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 MI vs RR: मुंबई इंडियन्सच्या संघाने महत्त्वाच्या लढतीत राजस्थानचा धुव्वा उडवला. मुंबईने अवघ्या ९ षटकात राजस्थानने दिलेले आव्हान पार केले. राजस्थानच्या संघाला २० षटकांमध्ये ९ बाद ९० धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर एव्हिन लुईसने सर्वाधिक २४ धावा केल्या. त्या खालोखाल डेव्हिड मिलरने १५ तर यशस्वी जैस्वाल आणि राहुल तेवातिया या दोघांनी प्रत्येकी १२ धावा केल्या. राजस्थानच्या संघाचा मानहानीकारक पराभव झाला. त्यासोबतच त्यांच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

मुंबईविरूद्ध खेळताना राजस्थानच्या संघाने २० षटकात ९ बाद ९० धावा केल्या. या डावात राजस्थानच्या केवळ चार फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या उभारली. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. संपूर्ण २० षटके खेळूनही राजस्थानच्या संघाला शंभरी गाठता आली नाही. त्यामुळे त्यांच्या नावावर विचित्र विक्रमाची नोंद झाली. शारजाच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करतानाची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.

याशिवाय, २० षटके पूर्ण खेळूनही सर्वात कमी धावसंख्या करणाऱ्यांच्या यादीत (lowest total by a team in the IPL which batted full 20 overs) राजस्थानने दुसरा क्रमांक लावला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने IPL 2020 हंगामात संपूर्ण २० षटके खेळून ८ बाद ८४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मुंबईविरूद्धच्या सामन्यात राजस्थानने ९ बाद ९० धावांपर्यंत मजल मारली.

loading image
go to top