
VIDEO: पाटीदारचा चेंडू थेट वृद्धाच्या डोक्यात; कोहलीला 'काका'ची चिंता
यंदाच्या आयपीएल हंगामात 60 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. चाहत्यांना सामन्यात भरपूर चौकार आणि षटकार पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदारने मारलेला षटकार चाहत्यांना चांगलाच महागात पडला कारण हा सिक्स थेट चाहत्याच्या डोक्यात बसला. (Rajat Patidar Six Hits An Old Fan Virat Kohli Reaction)
हेही वाचा: RCB vs PBKS : पंजाबची गुणतालिकेत मोठी उडी, RCB ची झाली गोची
रजत पाटीदारचा उत्तुंग षटकार वृद्धासाठी वेदनादायी ठरला. आरसीबीचा फलंदाज रजत पाटीदारने डावखुरा फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रारचा सामना करताना गगनचुंबी षटकार मारला. रजतच्या बॅटचा षटकार लाँग-ऑन भागात स्टँडवर बसलेल्या वृद्धाच्या डोक्याला लागला. चेंडू षटकारासाठी जाताच डगआऊटमध्ये बसलेला विराट कोहली या षटकारावर जल्लोष करताना दिसला. पण काही वेळातच विराट कोहलीच्या आनंदाचे चिंतेमध्ये रूपांतर झाले. खरंतर जेव्हा किंग कोहलीने स्टँडवर बसलेल्या वृद्ध व्यक्तीला चेंडूमुळे दुखापत झाल्याचे पाहिले तेव्हा विराटच्या चेहऱ्याचे भाव बदलले दिसले.
हेही वाचा: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने इतिहास रचला; थॉमस कप फायनलमध्ये धडक
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 9 बाद 209 धावा केल्या. आरसीबी संघाला गाठता आले नाही आणि 54 धावांनी सामना गमावला. आरसीबी संघाकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
Web Title: Rajat Patidar Six Hits An Old Fan Virat Kohli Reaction Rcb Vs Pbks Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..