Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या 'या' चुकीची शिक्षा मिळाली हार्दिक पांड्याला... भारतीय दिग्गजांचे मोठं वक्तव्य

Ravi Shastri on Mumbai Indians Captaincy IPL 2024 : रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्या हा नेतृत्वाचा बदल करताना संवादात स्पष्टता ठेवली असली तर हार्दिकला क्रिकेटप्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागला नसता.
Ravi Shastri on Mumbai Indians Captaincy IPL 2024 News Marathi
Ravi Shastri on Mumbai Indians Captaincy IPL 2024 News Marathisakal

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर रवी शास्त्री (Ravi Shastri on Mumbai Indians Captaincy IPL 2024) :

रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्या हा नेतृत्वाचा बदल करताना संवादात स्पष्टता ठेवली असली तर हार्दिकला क्रिकेटप्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागला नसता. कर्णधारपदाबाबतचा हा बदल व्यवस्थितपणे हाताळता आला असता, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

Ravi Shastri on Mumbai Indians Captaincy IPL 2024 News Marathi
Ind vs Ban series : टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध 'या' महिन्यात खेळणार 5 सामन्यांची टी-20 मालिका! जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

त्याचवेळी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे की, एमआयच्या चुकीमुळे चाहत्यांच्या संतापाची शिक्षा हार्दिकला दिली जात आहे. हा भारतीय संघ नाही तर फ्रँचाईसी क्रिकेट आहे. त्यासाठी संघ मालक करोडो रुपये खर्च करतात, त्यामुळे ते बॉस असतात. कोणाला कर्णधार करायचे हा त्यांना अधिकार असतो. तरीही एवढा मोठा बदल करताना जर स्पष्टता असती आणि सावधपणे बॅटन पास करण्यात आला असता तर आत्ताची परिस्थिती आली नसती, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.

Ravi Shastri on Mumbai Indians Captaincy IPL 2024 News Marathi
IPL 2024 हंगामातील सर्वात खतरनाक बॉल…. 35 वर्षाच्या इशांत शर्मानं रसेलला घालायला लावलं लोटांगण! Video Viral

आम्ही भविष्याचा विचार करत आहोत, नव्याने संघाची उभारणी करायची आहे. रोहितने कर्णधार म्हणून असामान्य कामगिरी केली आहे, हे प्रत्येकाला माहीत आहेच. पुढच्या तीन मोसमात तरी रोहितने हार्दिकच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे स्पष्टीकरण मुंबई इंडियन्सने रोहितऐवजी हार्दिक हा बदल सुरळीत झाला असता, असे शास्त्री यांनी सांगितले.

आम्हाला रोहित शर्मा नको आहे, असा चुकीचा संदेश सोशल मीडियावर गेला. त्यामुळे त्यांनी रोहितवर अन्याय झाला असा समज करून हार्दिकला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

Ravi Shastri on Mumbai Indians Captaincy IPL 2024 News Marathi
DC vs KKR : पंत लाज वाचवण्यासाठी झुंजला! तरी दिल्लीला केकेआरविरूद्ध कमी पडल्या 106 धावा

मुंबई इंडियन्सचा संघ एक विजय मिळवून विजयी मार्गावर आला तर हार्दिकला विरोध होत असलेली परिस्थिती बदलायला लागेल. त्यामुळे परिस्थिती प्रतिकूल असली तरी हार्दिकने शांत आणि संयमी राहावे, अजूबाजूला घडत असलेल्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करावे, मुंबई इंडियन्स हा बलवान संघ आहे. सलग तीन ते चार सामने जिंकले तर त्यांना रोखणे कठीण असेल, असे शास्त्री म्हणतात.

शेवटी निकाल हाच महत्त्वाचा असतो, संघ विजयी होत असताना इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. कधी कधी काही स्टोरी जाणीवपूर्वक तयार केल्या जातात. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य असते, असे शास्त्री यांनी सांगितले.

रोहित शर्मा गेली ११ वर्षे मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे, त्यामुळे त्याच्याबदल जिव्हाळा आणि प्रेम असणे स्वाभाविक आहे. शेवटी चाहते सर्वात महत्त्वाचे असतात. प्रामाणिक आणि भावनिक चाहते राजकारण करत नाहीत, हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर आणि समालोचक मॅथ्यू हेडन यांनी सांगितले. हार्दिकची कर्णधार म्हणून गुणवत्ता केवळ तीन सामन्यांतून करू शकत नाही, असाही उल्लेख हेडन यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com