
अश्विनने 'रिटायर्ड आऊट' होऊन स्वतःची इतिहासात केली नोंद
आयपीएलच्या इतिहासात (IPL History) पहिल्यांदाच एखादा फलंदाज रिटायर्ड आऊट (Retired Out) झाला. हा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या रविचंद्रन अश्निनने (Ravichandran Ashwin) आपल्या नाववर करून घेतला. तो लखनौ सुपर जायंटच्या सामन्यावेळी 18.2 षटके झाल्यानंतर रियायर्ड आऊट झाला. त्याने आपल्या जागी रियान परागला फलंदाजीला बोलवले.
हेही वाचा: IPL ड्रामा! तीन चेंडूत तीन वेळा बाद झाला अजिंक्य, पण...
राजस्थानची अवस्था 4 बाद 67 धावा अशी बिकट झाली असताना अश्विन आणि हेटमायरने डाव सावरत राजस्थानला शंभरी पार करून दिली. मात्र स्लॉग ओव्हर आल्यानंतर अश्विनने रियान परागला फलंदाजीला बोलावले. अश्विनने 23 चेंडूत 28 धावा करून एका बाजूने शिमरॉन हेटमायरला (Shimron Hetmyer) चांगली साथ दिली. हेटमायरने 36 चेंडूत 59 धावांची खेळी करत राजस्थानला 165 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, 'हेटमायर अश्विनच्या रियायर्ड आऊट होण्याच्या निर्णयावर बोलला. तो म्हणाला की, मला अश्विनच्या रिटायर्ड आऊटच्या निर्णयाबाबत काहीच माहिती नव्हते. अखेर तो निर्णय योग्य ठरला. आम्ही सामन्यात चांगली धावसंख्या उभारली. चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येत नव्हता.'
हेही वाचा: 'मुझे छोडकर जो तुम जाओगे, बडा पछताओ गे बडा पछताओ गे!'
विशेष म्हणजे अश्विन हा टी 20 क्रिकेटमध्ये रिटायर्ड आऊट होणारा 4 था फलंदाज ठरला. यापूर्वी शाहिद आफ्रिदी, एस. टोब्गे (भुटान), सुनझामुल इस्लाम हे रिटायर्ड आऊट झाले होते. रिटायर्ड आऊट ही एक रणनिती आहे. जेव्हा एखादा फलंदाज रिटायर्ड आऊट होतो त्यावेळी तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही. रिटायर्ड हर्टमध्ये फलंदाज बॅटिंग करण्यासाठी पुन्हा येऊ शकतो.
Web Title: Ravichandran Ashwin 1st Batsman Who Retired Out In Ipl History And 4th In T20 Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..