IPL 2023: प्लेऑफमधून बाहेर गेल्यावर RCB कर्णधार टीमवरच बरसला; 16व्यांदा स्वप्नभंग होण्याचेही सांगितले कारण

RCB कर्णधाराने संघावर उपस्थित केले प्रश्न अन्...

rcb captain-faf-du-plessis
rcb captain-faf-du-plessis

Faf Du Plessis RCB vs GT IPL 2023 : रविवारी झालेल्या करो किंवा मरोच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुजरात टायटन्सविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह आरसीबीचा आयपीएल 2023 मधील प्रवास संपला आहे. सामन्यानंतर बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्याच संघावर प्रश्न उपस्थित केले. या मोसमातही बंगळुरूचा संघ विजेतेपदापासून वंचित का राहिला हे पण सांगितले आहे.


rcb captain-faf-du-plessis
WTC Final : WTC फायनलपूर्वी कर्णधार रोहितसाठी वाजवली धोक्याची घंटा! संघाचा घातक फलंदाज झाला जखमी

सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार म्हणाला, "खूप निराश झालो. आज रात्री आम्ही खूप मजबूत संघ घेऊन खेळलो. शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. पहिल्या डावातही मैदान ओले झाले होते. अनेकदा चेंडू बदलावा लागला. विराट कोहलीने अविश्वसनीय खेळी खेळली. आम्हाला वाटले की आम्ही चांगली धावसंख्या उभारली आहे. पण शुभमन गिलने चांगला खेळ करून सामना आमच्यापासून दूर नेला.


rcb captain-faf-du-plessis
IPL 2023: विराट-RCBचा प्रवास संपला अन् नवीन उल हकने उडवली खिल्ली; सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

आरसीबीचा कर्णधार पुढे म्हणाला, फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, टॉप-4 चांगले खेळले. पण संपूर्ण हंगामात मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये. कोहली संपूर्ण हंगामात चमकदार खेळला.

तो पुढे म्हणाला, "दिनेश कार्तिकने गेल्या वर्षी शानदार फलंदाजी केली आणि शेवटी धावा केल्या. पण या हंगामात तो तसे करू शकला नाही. जर तुम्ही यशस्वी ठरलेल्या संघांवर नजर टाकली तर त्यांच्याकडे पाच आणि सहाव्या क्रमांकावर उत्कृष्ट हिटर फलंदाज आहेत.


rcb captain-faf-du-plessis
IPL 2023 Prize Money: विजेता संघ होणार मालामाल! जाणून घ्या कोणाला मिळणार किती बक्षीस रक्कम

आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव करणाऱ्या गुजरात टायटन्सने शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने पाच गडी गमावून 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.1 षटकांत चार गडी गमावून 198 धावा केल्या आणि सामना जिंकला. बंगळुरूकडून विराट कोहलीने नाबाद 101 धावांची खेळी केली. त्याचवेळी गुजरातकडून शुभमन गिलने नाबाद 104 धावांची खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com