RCB IPL 2024 playoff qualification scenarios News Marathi
RCB IPL 2024 playoff qualification scenarios News Marathisakal

RCB Playoff Scenario : RCB फॅनला १०० तोफांची सलामी! २ तास रिसर्च करून तयार केला IPL प्लेऑफचा रोडमॅप... समजून घ्या समीकरण

RCB's IPL 2024 playoff qualification scenarios : SRH हरवल्यानंतर RCB च्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या उंचावल्या आशा, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

RCB's IPL 2024 playoff qualification scenarios : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2024 मधील आपला दुसरा सामना जिंकला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभूत केले. या हंगामात आरसीबी प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे, परंतु RCB च्या एका चाहत्याने असे समीकरण तयार केले आहे, त्यानुसार जर काही घडले तर आरसीबी प्लेऑफमध्ये जाऊ शकते. या चाहत्याने दोन तास अभ्यास करून हे संपूर्ण समीकरण तयार केले आहे.

RCB IPL 2024 playoff qualification scenarios News Marathi
Team India Squad T20 WC24 : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातून हार्दिक पांड्याला डच्चू? राहुल, सॅमसनसह 'या' खेळाडूंवर नजर

आरसीबीच्या या चाहत्याने 14 गुणांसह संघाला प्लेऑफमध्ये नेले आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्रत्येकी 20 गुणांसह प्लेऑफमध्ये नेले आहे. तिसरा संघ म्हणून त्याने केकेआरला 16 गुणांसह प्लेऑफमध्ये जागा दिली.

तर लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जला त्याने टॉप चारमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तथापि, या समीकरणातही आरसीबीने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तरच प्लेऑफमध्ये जाईल. मग अशा स्थितीत त्यांचे एकूण गुण 14 गुण असतील.

हे समीकरण कितपत बरोबर आहे हे सांगता येणार नाही, पण जरी RCBने आपले सर्व सामने जिंकले तरी त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये जाणे खूप कठीण आहे, कारण इतर संघ त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत.

RCB IPL 2024 playoff qualification scenarios News Marathi
IPL 2024 KKR Vs PBKS : ईडन गार्डनवर आज पाहिला मिळणार सुनील नारायण, आंद्रे रसेलचा तांडव! पंजाब किंग्सशी आज लढत

9 पैकी 7 सामने गमावल्यानंतर आरसीबीचे 4 गुण झाले आहेत. मात्र, ते अजूनही दहाव्या स्थानावर आहे. आता त्याचे पाच सामने बाकी आहेत. आरसीबीला प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल तर त्यांना हे पाच सामने जिंकावे लागतील. फक्त जिंकायचे नाही तर विरोधी संघाला चांगल्या फरकाने पराभूत करायचे आहे, जेणेकरून त्याचा नेट रनरेटही सुधारता येईल. हे सर्व सामने जिंकल्यानंतर आरसीबीचे १४ गुण होतील.

आयपीएल 2024 चा 41 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 7 गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाला 8 विकेट गमावून केवळ 171 धावा करता आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com