एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा! पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये परतणार

आयपीएल 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्स परतणार
RCB legend AB de Villiers
RCB legend AB de Villierssakal

RCB legend AB de Villiers: आयपीएल 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्स परतणार आहे. 2008 मध्ये आयपीएल खेळायला सुरू केल्यानंतर डीव्हिलियर्स पहिल्यांदाच खेळला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या ३८ वर्षीय एबी डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयपीएल मधून निवृत्ती जाहीर केली होती.

RCB legend AB de Villiers
गुरु नेहराजींनी क्वालिफायर सामन्या आधी यजुवेंद्र चहलला दिला अनोखा प्रसाद

एबी डिव्हिलियर्सला एका मुलाखतीत विचारले होते की तो पुढील आयपीएल हंगामात प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे का? खरं सांगायचं तर मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र पुढील आयपीएलमध्ये मी येणार हे निश्चित आहे. मी ट्विटरवर पाहिले आहे की मी बंगलोर कॅम्पमध्ये सामील होऊ शकतो. त्यामुळे मला बेंगळुरू मध्ये परतायला आणि चिन्नास्वामीच्या खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये सामना पाहायला आवडेल.

RCB legend AB de Villiers
IPL मध्ये सट्टा लावणाऱ्या दोघांची तब्बल ९ वर्षांनी पुराव्याअभावी सुटका

एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी एकूण 156 सामने खेळले आहे. एबी डिव्हिलियर्सने यामध्ये 2 शतके आणि 37 अर्धशतकांच्या मदतीने 4491 धावा आहेत. ख्रिस गेला टी-20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक म्हटले जाते, त्याने आरसीबीसाठी 91 सामन्यात 3420 धावा केल्या, ज्यात 5 शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.

RCB legend AB de Villiers
तेल लावलेला पहिलवान आणि युपीचा बाहुबली; काय आहे व्हायरल फोटो मागचं रहस्य

इंडिजचा दिग्गज फलंदाज युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल म्हणाला की, माझ्याशी चांगली वागणूक केली गेली नाही. म्हणूनच मी आयपीएल 2022 मधून माघार घेतली. आयपीएलमध्ये गेल कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज कडून खेळला आहे. खराब फॉर्ममुळे ख्रिस गेल गेल्या हंगामामध्ये पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हत. आरसीबी आणि पंजाब यांच्यात एकाच संघात राहून जेतेपद पटकावायला मला आवडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com