WTC Final 2023 : RCB च्या पराभवाचं दुःख बाजूला सारून विराट लागला पुढच्या मिशनला, सिराजही...

Virat Kohli Mohammed Siraj WTC Final 2023
Virat Kohli Mohammed Siraj WTC Final 2023esakal

Virat Kohli Mohammed Siraj WTC Final 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामात शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा पराभव केला. या पराभवामुळे आरसीबीचे प्ले ऑफ गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. आरसीबीला गेल्या 16 हंगामात एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. यंदाच्या हंगामात विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये होता त्यामुळे आरसीबी फॅन्सना यंदा विजेतेपदाची प्रतिक्षा संपेल अशी आस होती मात्र त्यांची निराशा झाली.

आरसीबी फॅन्ससह संघासाठी जीव तोडून खेळणाऱ्या विराट कोहलीची देखील निराशाच झाली होती. पराभवानंतर विराट थोडाचा भावनिक झाल्याचेही दिसले. मात्र आता आरसीबीच्या पराभवाचे दुःख बाजूला सारून विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांनी पुढच्या मिशनसाठी आपली कंबर कसली आहे.

Virat Kohli Mohammed Siraj WTC Final 2023
Jessica Chastain: अवॉर्ड जिंकल्याच्या आनंदात भान विसरली अन् अभिनेत्री स्टेजवरच पडली! व्हिडिओ व्हायरल

विराट कोहली आणि मोहम्मद सिराज हे आज इंग्लंडसाठी रवाना झाले. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून भारतीय कसोटी संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. भारतीय कसोटी संघातील 10 खेळाडू आणि कोच राहुल द्रविड, सपोर्ट स्टाफ आधीच इंग्लंडला रवाना झाले आहेत.

अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन हे देधील इंग्लंडला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. या आठवड्याच्या शेवटी चेतेश्वर पुजारा देखील संघाशी जोडला जाईल. तो सध्या इंग्लंडमध्येच आहे तो ससेक्सकडून काऊन्टी खेळत आहे. रोहित शर्मा, इशान किशन, मोहम्मद शमी, शुभमन गिल, केएस भरत आणि अजिंक्य रहाणे सध्या प्ले ऑफ खेळत आहेत.

भारताने 2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशच आले आहे. भारतीय संघ दोन वर्षापूर्वी देखील WTC final मध्ये पोहचला होता. मात्र त्याला न्यूझीलंडने मात दिली होती. यंदा WTC फायनल खेळणाऱ्या भारतीय संघात ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, केएल राहुल नाहीयेत. ते दुखापतीमुळे खेळू शकरणार नाहीत.

Virat Kohli Mohammed Siraj WTC Final 2023
Ravindra Jadeja MS Dhoni Rift : सीएसकेच्या सीईओंचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, धोनी - जडेजा दुराव्यावर शिक्कामोर्तब?

भारतीय संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com