RCB VS CSK : 'मी लायक नाही...' RCBच्या कर्णधाराने जिंकलं मनं, 'या' खेळाडूला दिला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार, सांगितलं कारण

Faf du Plessis dedicates player-of-the-match award to Yash Dayal
Faf du Plessis dedicates player-of-the-match award to Yash Dayalsakal

Faf du Plessis dedicates player-of-the-match award to Yash Dayal : आयपीएल 2024 चा सर्वात रोमांचक सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यावर जगभरातील करोडो चाहत्यांची नजर होती, कारण या एका सामन्याने आयपीएल 2024 मध्ये चौथ्या क्रमांकावर पात्र ठरणारा संघही निश्चित झाला आहे.

चेन्नईला हरवून आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. या विजयानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

Faf du Plessis dedicates player-of-the-match award to Yash Dayal
Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

या सामन्यात फाफ डू प्लेसिसने 39 चेंडूत 54 धावांची खेळी केली. आरसीबीसाठी अर्धशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले, मात्र या पुरस्काराचे खरे पात्र यश दयाल असल्याचे फाफने सांगितले. फॅफने सामनावीराचा पुरस्कार आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालला समर्पित केला.

यशने ज्या प्रकारे हा सामना आरसीबीला जिंकून दिला, तो क्रिकेट चाहते अनेक दशके विसरू शकणार नाहीत. यशबद्दल फॅफ म्हणाला की, त्याला त्याच्या स्लोअर बॉलवर विश्वास आहे. चेंडू ओला झाला होता आणि त्यामुळे गोलंदाजाला खूप त्रास होत होता. पण तरीही यश शेवटच्या षटकात धावसंख्या वाचवण्यात यशस्वी ठरला.

Faf du Plessis dedicates player-of-the-match award to Yash Dayal
IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

या सामन्यात यश दयालने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते कौतुकास्पद आहे. त्यांच्यावर खूप दडपण होते, पण तरीही त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानली नाही. यशने पहिल्या चेंडूवर यॉर्कर टाखण्याचा प्रयत्न केला, ज्यावर माहीने षटकार मारला. यानंतर फॅफने यशला स्लो बॉलवर विश्वास ठेवण्यास सांगितले, कारण यॉर्कर चुकला तर त्याचे परिणाम धोकादायक होऊ शकतात. यशबाबत फॅफ म्हणाला की, तुमच्या कौशल्यावर आत्मविश्वास असायला हवा. तुम्ही खूप चांगले करत आहात आणि भविष्यातही चांगले काम कराल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com