'त्या' नो-बॉलच्या वादावर अखेर रिकी पाँटिंगने तोडले मौन | No Ball Controversy Ricky Ponting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

No Ball Controversy Ricky Ponting

'त्या' नो-बॉलच्या वादावर अखेर रिकी पाँटिंगने तोडले मौन

आयपीएल 2022 च्या हंगामात 34 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स निर्माण झालेला नो-बॉलचा वाद हा या वर्षातील लीगमधील सर्वात मोठा वाद बनला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत सुरू असलेल्या सामन्यात ज्या प्रकारे आपल्या खेळाडूंना मैदानाबाहेर येण्यास प्रवृत्त करत होता, त्यावर संपूर्ण क्रिकेट जगतातून टीका होत आहे. त्या सामन्यात पंचांच्या निर्णयानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे (Pravin Amre) संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होते. आता कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.(No Ball Controversy Ricky Ponting)

हेही वाचा: गुजरात टायटन्सला आठव्या विजयाची प्रतीक्षा, बंगळूरविरुद्ध आज सामना

दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग त्याच्या कुटुंबातील एक सदस्य कोविड -19 पॉझिटिव्ह असल्यामुळे सामन्यासाठी आला नव्हता. आता पाँटिंगने या संपूर्ण वादावर आता मौन सोडले आहे. पॉन्टिंगने स्टार स्पोर्ट्स बरं बोलताना सांगितले की, जे काही झाले ते सर्व चुकीचे होते. अंपायरचा निर्णय योग्य नव्हता, पण आम्हाला पुढे जावे लागेल. आमच्या खेळाडूंची वर्तणूक आणि सहाय्यक प्रशिक्षक ज्या पद्धतीने मैदानावर गेले याचा अभिमान वाटावा असे नाही. याबाबत मी त्यांच्याशी बोललो आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ गेल्या काही दिवसांपासून कठीण काळातून जात आहे. टीममध्ये काही खेळाडूंना कोविड झाला होता. त्यानंतर त्याना हॉटेल रूम क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. त्यावर सर्वांमध्ये नाराजी होती.

हेही वाचा: PBKS vs LSG : पंजाबचा पराभव करत लखनौची प्ले ऑफच्या दिशेने कूच

काय झालं होतं त्या सामन्यात?

सामन्याच्या शेवटच्या षटकातील ओबेड मैककॉयच्या तिसऱ्या चेंडूला अंपायरने नो-बॉल दिला नाही, त्यावर पंत संतापला आणि फलंदाजी करत असल्या रोव्हमन पॉवेल आणि कुलदीप यादव यांना पॅव्हेलियनमध्ये परतण्याचे संकेत देत होता. त्याचवेळी सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे हे पंचांशी बाचाबाची करण्यासाठी मैदानात आले. या कृत्यासाठी पंतला नंतर त्याची संपूर्ण मॅच फी गमवावी लागली. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. अमरेला मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला होता, तर त्याच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती.

Web Title: Ricky Ponting Dc Coach Breaks Silence No Ball Controversy Rishabh Pant Pravin Amre Dc Vs Rr Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top