
चुकीला माफी नाही; पंतला मिळाली सजा, कोच आमरेंवर एका सामन्यासाठी बंदी
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर (शुक्रवारी) सामना झाला. कर्णधार ऋषभ पंतला सामन्यादरम्यान केलेल्या वागणुकीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंत दोषी आढळला असून. पंतला मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पंतने लेव्हल- 2 चा गुन्हा मान्य केला आहे. दिल्लीचा कर्णधार कलम 2.7 मध्ये दोषी आढळला असून. दिल्ली कॅपिटल्सच्या शार्दुल ठाकूरला सामन्याच्या टक्केवारीच्या 50% दंड ठोठावण्यात आला आहे. (NO Ball Controversy)
हेही वाचा: हे क्रिकेट आहे फुटबॉल नाही; पीटरसन ने पंतचे कान उपटले
दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनाही त्यांच्या मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला. यासोबतच त्याच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली आहे. अमरे यांच्यावर कलम 2 आणि 2.2 चे उल्लंघन केल्याचा आरोप होता जो त्यांनी मान्य केला.(Rishabh Pant Fined 100 Percent Match Fee)
हेही वाचा: IPL 2022: हंगरगेकरचा 'तो' फोटो व्हायरल; CSK वर चाहते नाराज
सामन्याचे शेवटचे ओव्हर करत असलेल्या ओबेड मैकॉयच्या तिसऱ्या चेंडूला अंपायरने 'नो-बॉल' दिला नाही. तर पंतसह दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण कॅम्पला तो नो-बॉल वाटत होता. यानंतर पंतने सहायक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना मैदानात पाठवले. प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी 'नो-बॉल' तपासणीसाठी इशारा केला, ज्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. पंतने आपली चूक मान्य केली आणि म्हणाला- मला वाटते की तो संपूर्ण सामन्यात चांगली गोलंदाजी करत होता, पण शेवटी आम्हाला संधी दिली. मला वाटले की नो बॉल आमच्यासाठी मौल्यवान असू शकतो. निराश झालो पण त्याबद्दल फार काही करू शकत नाही.
Web Title: Rishabh Pant Fined 100 Percent Match Fee And Pravin Amre Banned For One Match After No Ball Controversy Dc Vs Rr Ipl2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..