आयपीएल २०२५ स्पर्धा लवकरच सुरू होईल. या स्पर्धेसाठी आता सर्व संघांचे खेळाडू एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार ऋषभ पंत देखील लखनौमध्ये पोहचला आहे. .यादरम्यान खेळाडू सरावासोबतच थोडी मस्ती करतानाही दिसत आहे. असाच ऋषभ पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक झहीर खान याला प्रभवित करण्यासाठी गाणं गाताना दिसतोय..तल्हा अंजुम आणि तल्हा युनूस यांच लोकप्रिय पाकिस्तानी गाण 'अफसाना' गाताना ऋषभ पंत दिसला आहे. त्यावेळी झहीरही त्याच्या गाण्याचा आनंद घेताना दिसतोय. तसेच शेवटी तो त्याच्यासोबत काही तरी बोलतानाही दिसला, ज्यावर दोघेही हसले. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत असून त्यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत..Shocking: बड्या IPL फ्रँचायझीची प्रमुख खेळाडूला 'अनफिट' जाहीर करण्याची मागणी; लीगच्या इतिहासात प्रथमच घडले, सारे चक्रावले.आईपीएल २०२५ च्या आधी लखनौचा कर्णधार म्हणून ऋषभ पंतची नियुक्ती केली. गेल्या वर्षी आईपीएल लिलावात एलएसजीने या यष्टीरक्षक-फलंदाजाला २७ कोटी रुपयांना खरेदी केले तो लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला..एलएसजीचे मालक डॉ. संजीव गोएंका यांनी सांगितलं की आम्ही लिलावात ऋषभ पंतला घेतल्यावर एक निर्णय घेण्याचं ठरवलं. त्याला लखनौचा कर्णधार म्हणून नियुक्त करायचं. पण आम्ही याची घोषणा एकत्रित करण्यासाठी या क्षणाची वाट पाहत होतो असे डॉ. संजीव गोएंका यांनी सांगितले..Rinku Singh, आंद्रे रसेलसह सारेच पेटले! IPL 2025 पूर्वी आतषबाजी; अजिंक्य रहाणेचा संघ १५.५ षटकांत २१६ धावा करून जिंकला, Video.ऋषभने २०१६ साली आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून १११ सामन्यांमध्ये ३५.३१ च्या सरासरीने आणी १४८.९३ च्या स्ट्राईक रेटने ३,२८४ धावा केल्या आहेत. त्याने यासाठी एक शतक आणि १८ अर्धशतके केली. एलएसजी चा कर्णधार म्हणून घोषित झाल्यानंतर ऋषभ पंत पत्रकार परिषदेत बोलत असताना म्हणाला, "मी माझे २००% देईन. माझ्या संघासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करेन. मी आयपीएल २०२५ साठी खूप उत्साही आहे..केएल राहुल, निकोलस पूरन आणि कृणाल पंड्यानंतर पंत हा लखनौचा चौथा कर्णधार असेल. २०२१, २०२२ आणि २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केल्यानंतर आयपीएलमध्ये पंतचा कर्णधार म्हणून हा दुसरा कार्यकाळ असेल. २४ मार्च रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२५ च्या त्यांच्या सलामीच्या सामन्यात एलएसजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध भिडेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.