
Rishabh Pants Concerns Increase : इंडियन प्रिमिअर लीगचा १८ वा हंगाम अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व फ्रॅंचायझी आपल्या प्रॅक्टीस कॅम्पला सुरूवात केली आहे. अशात लखनौ सुपर जायंट्सचे तिन प्रमुख गोलंदाज दुखापतीतून सावरत आहेत. आयपीएल सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक असताना त्यांची संघातील उपस्थिती अजूनही अनिश्चित आहे. त्यामुळे कर्णधार रिषभ पंतचे टेंशन आता वाढले आहे.