Riyan Parag YouTube History Leak
Riyan Parag YouTube History Leaksakal

Riyan Parag Video : हॉट अनन्या पांडे अन् सारा... हे काय सर्च करतोय रियान पराग? YOUTUBE हिस्ट्री झाली लीक

Riyan Parag YouTube History Leak : आयपीएलच्या या हंगामात राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागने आपल्या धमाकेदार कामगिरीने सर्वांना थक्क केले.

Riyan Parag YouTube History Leak : आयपीएलच्या या हंगामात राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागने आपल्या धमाकेदार कामगिरीने सर्वांना थक्क केले. परागने 15 आयपीएल सामन्यांमध्ये 52.09 च्या सरासरीने आणि 149.22 च्या स्ट्राइक रेटने 573 धावा केल्या. परंतु पराग आता त्याच्या यूट्यूब हिस्ट्रीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

Riyan Parag YouTube History Leak
Ambati Rayudu: 'तू जोकर आहेस...', IPL फायनलनंतर पीटरसनने ऑन-एअर रायुडूला का मारला टोला? Video व्हायरल

खंरतर, रियान परागचा देखील एक गेमिंग चॅनल आहे. ज्यामध्ये तो लाइव्ह स्ट्रीमिंग करतो. या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान पराग यूट्यूबवर कॉपीराइट फ्री म्युझिक सर्च करणार होता. पण तो स्क्रीन लपवायला विसरला. त्याने सर्च बॉक्सवर क्लिक करताच त्याची सर्च हिस्ट्री दिसली ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावे दिसत होती.

Riyan Parag YouTube History Leak
IPL 2024: आई आजारी असताना KKR च्या खेळाडूने खेळली फायनल; सामन्यानंतर सांगितलं, 'मी तिला विचारलं होतं...'

सर्च सेक्शनमध्ये सारा अली खान हॉट आणि अनन्या पांडे हॉट असे लिहिले आहे. परागचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या प्रकरणात किती तथ्य आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रियान पराग याआधीही वादात सापडला आहे. कधी सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी मैदानावरील काही विचित्र कृत्यांमुळे.

गेल्या हंगामात रियान परागची बॅट शांत होती. ज्यासाठी त्याला खूप ट्रोल करण्यात आले, पण या हंगामामध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली. आयपीएल 2024 मध्ये तो तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. या हंगामात परागने 15 सामन्यांच्या 14 डावांमध्ये फलंदाजी केली आणि 52.09 च्या सरासरीने आणि 149.22 च्या स्ट्राइक रेटने 573 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून 4 अर्धशतके झळकावली. परागने 40 चौकार आणि 33 षटकार मारले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com