
Rajasthan Royals New Captain For First 3 Matches : आयपीएल २०२५ हंगामाला सुरूवात होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजस्थान रॉयल्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. IPL 2025 मधील पहिल्या तीन सामन्यात रियान पराग राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणार आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन बोटाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर मैदानाबाहेर होता. संजू आयपीएल खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता, पण राजस्थानने आता संजू आयपीएल खेळणार की नाही याबाबत देखील आपला निर्णय कळवला आहे.