
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. रोहित ने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई संघाला पाच वेळेस आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली. यादरम्यान त्याच्या नावे अनेक मोठ्या रेकॉर्ड्सची नोंद देखील झाली आहे. आणखी एक विक्रम रोहितने नावावर केला . मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आला.