Rohit Sharma : माझं काय, हा शेवटचा… रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ; KKR ने डिलीट केलेला Video पुन्हा झाला Viral

Rohit Sharma and Abhishek Nair Video Viral : आयपीएल 2024 च्या सुरुवातीपासूनच भारतीय कर्णधार रोहित शर्मा चर्चेत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले.
Rohit Sharma and Abhishek Nair Video Viral
Rohit Sharma and Abhishek Nair Video Viralsakal

KKR vs MI IPL 2024 Rohit Sharma and Abhishek Nair : आयपीएल 2024 च्या सुरुवातीपासूनच भारतीय कर्णधार रोहित शर्मा चर्चेत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले. आणि त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे मुंबईची कमान सोपवण्यात आली होती.

मात्र, हार्दिक पांड्याचे कर्णधारपद मुंबईसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी राहिलेले नाही. या हंगामात बाहेर पडणारा मुंबई पहिला संघ ठरला आहे. रोहित शर्मासाठी पण यंदाचा आयपीएल हंगाम चांगला राहिला नाही. तो धावा काढताना संघर्ष करताना दिसला.

Rohit Sharma and Abhishek Nair Video Viral
केंद्रीय करारातून अय्यर, ईशानला वगळण्याचा निर्णय माझा नाही तर...; BCCI सचिव जय शहा यांचा मोठा खुलासा

आज ईडन गार्डनवर मुंबई इंडियन्स संघाचा सामना केकेआरशी होणार आहे. यादरम्यान रोहित शर्मा केकेआरचे प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलताना दिसला. आणि रोहित अभिषेकसोबत काय बोलत होता हे संपूर्ण संभाषण स्पष्ट झाले नाही परंतु व्हिडिओमध्ये काय ऐकले याबद्दल चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या पेजवरून डिलीट केला होता. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओमुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सपासून वेगळे झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Rohit Sharma and Abhishek Nair Video Viral
MS Dhoni Fan : धोनीचा क्रेझी फॅन अचानक घुसला मैदानात... धरले ‘थला’चे पाय अन् पुढे...; व्हिडिओ व्हायरल

पण व्हिडीओमध्ये रोहित आणि केकेआरचे प्रशिक्षक यांच्यात काय बोलणे झाले ते जाणून घेऊया. मात्र, या संभाषणात रोहित शर्माने मुंबई इंडियन्स किंवा इतर कोणत्याही आयपीएल संघाचे नाव घेतले नाही.

व्हिडिओच्या सुरुवातीला रोहित शर्मा म्हणाला की, "प्रत्येक गोष्ट बदलत आहे. हे त्यांच्यावर अवलंबून आहे, मी त्याकडे लक्ष देत नाही." व्हिडिओमध्ये आवाज स्पष्ट येत नसला तरी. त्यामुळे काही गोष्टी कळतही नाहीत.

त्यानंतर रोहित शर्मा पुढे म्हणाला, "जे काही आहे... ते माझे घर आहे, ते मंदिर आहे जे मी बांधले आहे." याशिवाय अनेक चाहते असा दावाही करत आहेत की, व्हिडिओच्या शेवटच्या ओळीत रोहित शर्माने ‘माझं काय, हा शेवटचा’ असे म्हटले आहे. मात्र, याबाबत आवाज स्पष्ट झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com