SRH vs MI IPL 2023 : मुंबईचा सलग तिसरा विजय, हैदराबादचा केला 14 धावांनी पराभव

SRH vs MI IPL 2023
SRH vs MI IPL 2023 esakal

SRH vs MI IPL 2023 : SRH vs MI : Arjun Tendulkar SRH vs MI : मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा त्यांच्याच मैदानावर 14 धावांनी पराभव करत आपल्या विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 193 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना हैदराबादचा संघ 178 धावात पॅव्हेलियनमध्ये गेला. मुंबईकडून बेहरेनडॉर्फ, मेरेडिथ, पियुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आपला दुसरा सामना खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने देखील आज आपला 4 षटकाचा पूर्ण कोटा गोलंदाजी करत 18 धावा देत 1 बळी टिपला. मुंबईने या विजयाबरोबरच गुणतालिकेत 6 गुण घेत सहाव्या स्थानावर झेप घेतली.

मुंबईने हैदराबादविरूद्ध प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 बाद 192 धावा केल्या. मुंबईकडून कॅमरून ग्रीनने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने 16 चेंडूत 37 धावा चोपत स्ट्राईक रेट वाढवून दिला. हैदराबादकडून जेनसेनने 2 फलंदाज बद कले.

95-3 : सूर्य पुन्हा झाकोळला

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशनने कॅमरून ग्रीनसोबत मुंबईला 87 धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्यानंतर मार्को जेनसेनने इशानला 38 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्याने एक षटकार मारला मात्र त्यानंतर 7 धावांवर तो बाद झाला. त्याचीही जेनसेननेच शिकार केली.

41-1 (Rohit Sharma, 4.4) : मुंबईला मोठा धक्का

रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबई इंडियन्सला आक्रमक सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र फटकेबाजी करणाऱ्या रोहित शर्माला नटराजनने बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. रोहितने 18 चेंडूत 28 धावा केल्या.

मुंबईच्या संघात एक बदल 

मुंबईने आपल्या संघात एक बदल केला आहे. डुआन जेनसेनच्या ऐवजी बेहरनडॉर्फला संधी देण्यात आली आहे. गेल्या सामन्यात पदार्पण करणारा अर्जुन तेंडुलकर आजच्या सामन्यात देखील खेळणार आहे.

हैदराबादने नाणेफेक जिंकली.

सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com