
सचिनचा अर्जुला सल्ला; मार्ग खडतर असणार!
मुंबई : सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) गेल्या 28 आयपीएल सामन्यापासून बेंच उबवतोय. गेल्या दोन हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. यंदाच्या हंगामात मुंबईची कामगिरी खराब झाली होती. त्यामुळे ते आधीत प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले होते. अशा परिस्थितीत अर्जुन तेंडुलकरला आयपीएल (IPL 2022) पदार्पण करणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मुंबईने शेवटपर्यंत त्याला संधी दिली नाही. आता सचिन तेंडुलकरने आपल्या मुलाला तुझा मार्ग खूप खडतर असणार आहे. त्यामुळे तुला जास्त कष्ट करावे लागतील असे सांगितले.
हेही वाचा: सायकल मोडली म्हणून ४० किलोमीटर पायी जायचा, भारतीय संघात झालीय निवड
सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मेंटॉर आहे. मात्र तो संघाच्या निवडीत हस्तक्षेप करत नाही. अर्जुन हा डावखुरा वेगावान गोलंदाज आणि फलंदाज आहे. त्याला मुंबई इंडियन्सने त्याच्यावर 30 लाख रूपये बोली लावून आपल्या संघात घेतले. तो गेल्या दोन हंगामापासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. दरम्यान, अर्जुनला या हंगामात खेळताना पाहणे तुला आवडले असते का असा प्रश्न विचारल्यावर सचिन तेंडुलकर एका शोमध्ये बोलताना म्हणाला की, 'हा प्रश्न वेगळा आहे. याबाबत मी काय विचार करतोय किंवा मला काय वाटतयं हे महत्वाचे नाही. हंगाम आता संपला आहे.'
सचिन पुढे म्हणाला की, 'अर्जुनबरोबर ज्यावेळी माझे बोलणे होते त्यावेळी मी त्याला तुझा मार्ग खूप खडतर आहे. तू क्रिकेट खेळायला लागलास कारण तुझे क्रिकेटवर प्रेम आहे. तू जे करत आहेस ते करत रहा सतत कष्ट करत राहा तुला त्याचे परिणाम नक्की दिसतील.'
हेही वाचा: कुंबळे सेहवागला म्हणला होता, कर्णधार आहे तोपर्यंत तू संघात राहशील
सचिन तेंडुलकरने सांगितले की, ज्यावेळी संघ निवडीचा विषय येतो त्यावेळी हा अधिरा संघ व्यवस्थापनाचा असतो. तो पुढे म्हणाला की, 'निवडीबाबत बोलायचे झाले तर मी कधीही निवड प्रक्रियेत सहभागी नसतो. मी या सर्व गोष्टी संघ व्यवस्थापनाकडे सोपवतो.' 22 वर्षाच्या अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून दोन टी 20 सामने खेळले आहेत. याचबरोबर तो टी 20 मुंबई लीग देखील खेळतो.
Web Title: Sachin Tendulkar Said Arjun Tendulkar Path Is Going To Be Challenging Difficult
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..