Sarfaraz Khan IPL 2024 : बेस प्राईस 20 लाख असूनही सर्फराज होता अनसोल्ड; मात्र आता उघडणार नशीब

Sarfaraz Khan
Sarfaraz Khanesakal
Updated on

Sarfaraz Khan IPL 2024 : देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवल्यानंतर मुंबईचा फलंदाज सर्फराज खान टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करण्यात यशस्वी ठरला. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सर्फराजला खेळण्याची संधी मिळाली.

पदार्पणाच्या कसोटीतच सर्फराजने दोन्ही डावात अर्धशतके झळकावून चमकदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील अनेक संघ त्याच्या हात धुवून मागं लागले आहेत. विशेष म्हणजे तो आयपीएल 2024 च्या लिलावात 20 लाख बेस प्राईस असूनही अनसोल्ड राहिला होता.

Sarfaraz Khan
IPL 2024 SRH Captain : सनराईजर्स हैदराबाद कर्णधार बदलणार; सलग दोन विजेतेपदं जिंकून दिली तरी मार्करमची होणार गच्छंती?

वास्तविक, सर्फराज खानला दिल्ली कॅपिटल्स संघाने नवीन हंगामापूर्वी सोडले होते. दिल्लीपूर्वी, तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा भाग होता. यानंतर तो पंजाब किंग्जमध्ये आला आणि नंतर दिल्ली संघाने त्याला विकत घेतले. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करूनही सर्फराजला आयपीएलमध्ये कोणत्याही संघाकडून चांगली कामगिरी करता आलेली नाही.

सरफराज खान इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर आला होता, परंतु त्याच्यावर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही. मात्र, टीम इंडियासाठी दमदार पदार्पण केल्यानंतर त्याचे नशीब उघडू शकते, असे आता मानले जात आहे. रिपोर्टनुसार, काही फ्रँचायझी आहेत ज्यांना सर्फराजला आपल्या संघात समाविष्ट करायचे आहे.

Sarfaraz Khan
IPL 2024 SRH Captain : सनराईजर्स हैदराबाद कर्णधार बदलणार; सलग दोन विजेतेपदं जिंकून दिली तरी मार्करमची होणार गच्छंती?

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ सरफराजला जोडू इच्छित आहेत. याशिवाय त्याची जुनी फ्रँचायझी आरसीबी देखील त्याच्यासाठी इच्छुक आहे परंतु केकेआर आणि सीएसके त्याला सोबत घेण्याची अधिक शक्यता आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com