

Singapore Open Win
esakal
सिंगापूर : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने जेतेपदाचा दुष्काळ संपवला. माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या या जोडीने रविवारी अंतिम फेरीच्या लढतीत फजार ॲल्फियन-मुहम्मद फिकरी या इंडोनेशियाच्या जोडीचे कडवे आव्हान तीन गेममध्ये परतवून लावत सिंगापूर ओपन या बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.