KKR IPL 2024 : पूजा मला हा हेअर कट पाहिजे... खुद्द शाहरूखच झाला केकेआरच्या या स्टायलिश खेळाडूच्या हेअर स्टाईलचा फॅन

Shah Rukh Khan
KKR IPL 2024 Esakal

Shah Rukh Khan Love Suyash Sharma Hair Style IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सह-मालक शाहरुख खान इतरांचा चाहता असणे अत्यंत दुर्मिळ आहे. आयपीएलचा हंगाम सुरू आहे, एसआरके अर्थात शाहरूख केकेआरच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर येतोय. यादरम्यानच शाहरूख केकेआरच्या एका खेळाडूच्या हेअर कटचा चाहता झाला. हा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून तो सुयश शर्मा आहे.

सामन्यानंतर खेळाडूंशी भेटीगाठी करताना शाहरूख खानचे लक्ष सुयश शर्माच्या हेअर स्टाईलकडे गेले. त्यानंतर शाहरूखने त्वरित आपली मॅनेजर पूजाला बोलवून सांगितले की त्याला स्पिनरसारखीच हेअरस्टाईल हवी आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

Shah Rukh Khan
IPL 2024: तब्बल 47 कोटींच्या खेळाडूंना RCB ने बेंचवर बसवलं... माजी भारतीय क्रिकेटरची पोस्ट चर्चेत

ईडन गार्डन्सवर आज केकेआर आणि पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होत आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थानने सहापैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. तर पाच सामन्यातील चार सामने जिंकणारी केकेआर आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आजचा सामना जर केकेआरनं जिंकला तर त्यांचे देखील 10 गुण होतील.

केकेआरचे नेट रनरेट हे +1.688 इतके आहे तर राजस्थानचे नेट रनरेट हे +0.767 इतके आहे. त्यामुळे केकेआर गुणांची बरोबरी करून देखील राजस्थानचे अव्वल स्थान हिसकावून घेऊ शकतो.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com