DC vs KKR Video: 'गब्बर'चा सुनील नारायणला दणका.. दोन चेंडूत दोन सिक्सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar-Dhawan-Six

शिखर धवनने पहिल्या षटकात केला हल्लाबोल

Video: 'गब्बर'चा सुनील नारायणला दणका.. दोन चेंडूत दोन सिक्सर

IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR Video: कोलकाताविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात दिल्लीच्या संघाने नाणेफेक गमावली. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दोन षटकात हा निर्णय चांगला ठरताना दिसला. पण तिसऱ्या षटकात दिल्लीच्या सलामीवीरांनी हल्लाबोल करण्यास सुरूवात केली. शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ याने पुढे येऊन उत्तुंग असा षटकार लगावला. तर त्या पाठोपाठ शिखर धवननेही सुनील नारायणवर हल्ला चढवला.

सुनील नारायणने गेल्या सामन्यात ४ षटकात २० धावा देऊन ४ अमूल्य बळी मिळवले होते. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. अशा वेळी शिखर धवनला त्याने एक चेंडू फुलटॉस टाकला. त्या चेंडूवर धवनने षटकार लगावला. त्यानंतर पुढचा चेंडू थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता, पण त्या चेंडूवरही धवनने त्याच दिशेला षटकार लगावला.

दरम्यान, शिखर धवनच्या या दमदार फटकेबाजी नंतर लगेचच पुढच्या षटकात वरूण चक्रवर्तीने पृथ्वी शॉ याला माघारी धाडले. पृथ्वी शॉ याने २ चौकार आणि एक षटकार खेचत १८ धावा केल्या.