
IPL VIDEO: मैदानात नाही तर स्विमिंग पूलमध्ये शिखर धवनने घेतला जबरदस्त कॅच
IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये शिखर धवन आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे. धवनचा संघ पंजाब किंग्जही या हंगामात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. पंजाब सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या 5 पैकी 3 सामने जिंकले असून 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबचा पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या सामन्यापूर्वी शिखर धवनचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये धवन स्विमिंग पूलमध्ये कॅच घेताना दिसत आहे.(Shikhar Dhawan Swimming Pool Video)
धवनने त्याच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो जॉन्टी रोड्ससोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. धवन स्विमिंग पूलमध्ये डाइव करून झेल घेताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धवनच्या या व्हिडिओला ट्विटरवर जवळपास 2 हजार लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हंगामात धवनने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने 197 धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 19 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धवनने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. ज्यात 50 चेंडूत 70 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 3 षटकारही खेचून मारले. त्याच्यासोबत या सामन्यात मयंक अग्रवाल याने ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होते.
Web Title: Shikhar Dhawan Swimming Pool Video Viral Ipl 2022 Punjab Kings
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..