CSK vs RCB Shivam Dube
CSK vs RCB Shivam Dube IPL

IPL 2022 : शिवम दुबेची सेंच्युरी हुकली, पण...

Published on

चेन्नई सुपर किंग्जने मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धची लढाई 200 पारची केली आहे. पहिल्या दोन विकेट स्वस्तात गमावलेल्या चेन्नई संघाचा डाव सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे (Shivam Dube) या जोडीनं सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी रचली. शिवम दुबेनं नाबाद 95 धावा केल्या. ही खेळी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे. याशिवाय त्याने बंगळुरु विरुद्ध चेन्नईकडून सर्वाधिक धावांची खेळी करणाऱ्या मुरली विजयच्या विक्रमाशीही बरोबरी केलीये. याआधी 2011 च्या हंगामात मुरली विजयने चेन्नईकडून खेळताना बंगळुरु विरुद्ध 95 धावांची खेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com