Pune Cricket: अवनिश बुधवानीचा घातक मारा अन् शरण हारलेची तुफानी खेळी; श्री क्रिकेट क्लबचा दणदणीत विजय
Shree Cricket Club Registers Dominant Victory: सदू शिंदे क्रिकेट स्पर्धेत श्री क्रिकेट क्लबने मेलबोर्न क्लबवर शानदार विजय मिळवला. अवनिश बुधवानीच्या भेदक गोलंदाजी आणि शरण हारलेच्या दमदार खेळीने सामना गाजला.
पुणे : पुणे जिल्हा क्रिकेट संघटना (पीडीसीए) आयोजित सदू शिंदे साखळी क्रिकेट स्पर्धेत श्री क्रिकेट क्लबने मेलबोर्न क्लबचा आठ गडी राखून पराभव केला. त्यात महत्वाचा वाटा अवनिश बुधवानीने केलेल्या अचूक गोलंदाजीचा होता.