श्रेयसची चॉईसच निराळी; विराट-रोहित नाही तर 'हा' अपयशी कर्णधार आवडीचा | Shreyas Iyer Says His Favorite Captain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer Says His Favorite Captain is KL Rahul

श्रेयसची चॉईसच निराळी; विराट-रोहित नाही तर 'हा' अपयशी कर्णधार आवडीचा

नवी दिल्ली: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मर्यादित षटकांच्या सामन्याबरोबरच कसोटी क्रिकेटमधील आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार झालेला श्रेयस अय्यर सध्या आयपीएलची तयारी करत आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरला त्याचा आवडता कर्णधार (Favorite Captain) कोण असे विचारण्यात आले. मुंबईकर श्रेयस अय्यर एकतर रोहित शर्माचे किंवा विराट कोहलीचे नाव घेईल असे वाटत होते. मात्र अय्यरने लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलचे (KL Rahul) नाव घेत सर्वांनाच धक्का दिला.

हेही वाचा: IPL 2022 मध्ये आता विदर्भाची 'पंच'गिरी

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त झाल्याने केएल राहुलला वनडे मालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. याचबरोबर एका कसोटी सामन्यात देखील त्याला कॅप्टन्सी करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याच्या नेतृत्वात भारताने एकही सामना जिंकला नाही. दरम्यान अय्यरने आपला आवडता कर्णधार म्हणून केएल राहुलचे नाव घेतले. तो म्हणतो, 'केएल राहुलच्या नेतृत्वात खेळण्याचा अनुभव चांगला होता. तो एक चांगला खेळाडू आहे. मैदानावर आणि टीम मिटिंगमध्ये त्याच्यात आत्मविश्वास दिसतो. ज्या प्रकारे तो खेळाडूंचे समर्थन करतो ते खूप चांगले आहे.'

हेही वाचा: वर्षात सलग 20 विजय मिळवणारा 'स्पॅनिश बुल' अमेरिकन टेलरने रोखला

अय्यर पुढे म्हणाला, 'केएल राहुल खूप शांत स्वभावाचा आणि तो मैदानावर सहजरित्या निर्णय घेतो. त्याच्या नेतृत्वात खेळण्यात मजा आली.' केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या वनडे मध्ये श्रेयस अय्यरला गोलंदाजी (Shreyas Iyer Bowling) करण्याची संधी दिली होती. याबाबत अय्यर गंमतीने म्हणाला की, 'त्याने मला तीन ओव्हर गोलंदाजी करण्यास दिली. यापूर्वी कोणत्याही कर्णधाराने असे केले व्हते. त्यामुळेच तो माझा आवडता कर्णधार आहे.'

केएल राहुल गेल्या हंगामात पंजाब किंग्जचा कर्णधार होता. मात्र त्याला संघाला प्ले ऑफमध्ये पोहचवण्यात अपयश आले होते. त्यावेळी त्याच्या कॅप्टन्सीवर टीका देखील झाली होती. असे असले तरी टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार म्हणून केएल राहुलकडेच पाहिले जात आहे. लखनौचे नेतृत्व करणाऱ्या राहुलला 2022 मध्ये आपले नेतृत्व सिद्ध करून दाखवण्याची संधी आहे.

Web Title: Shreyas Iyer Says His Favorite Captain Is Kl Rahul Because He Gave Me Bowling

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..