
शुभमनची एलॉन मस्कला विनंती, 'स्विगी सुद्धा विकत घ्या' चाहत्यांनी केले ट्रोल
Shubman Gill and Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन रीव्ह मस्क यांनी अलीकडेच ट्विटर $ 44 अब्जांना विकत घेतले. एलोन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून लोक ट्विटरवर अधिक सक्रिय झाले आहेत. अनेकांनी इलॉन मस्क यांना आणखी काही कंपन्या विकत करण्याचा सल्ला दिला आहे. या यादीत भारताचा युवा फलंदाज आणि गुजरात टायटन्सचा (GT) खेळाडू शुभमन गिलचे नावही जोडले गेले आहे. (Shubman Gill Request To Twitter New Boss Elon Musk)
गिलने ट्विटरवर इलॉन मस्क यांना विनंतीही केली आहे. कृपया स्विगी खरेदी करा जेणेकरून डिलिव्हरी वेळेवर पोहोचेल. शुभमनने या ट्विटमध्ये एलोन मस्कलाही टॅग केले आहे. इलॉन मस्कने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण चाहत्यांनी शुभमनला ट्रोल केले आहे.
एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, स्विगी तुझ्या बॅटिंगपेक्षा वेगवान आहे. एका महिला चाहत्याने लिहिले - तुम्हाला स्विगीची काय गरज आहे? मी तुझ्यासाठी स्वयंपाक करू शकते. इलॉन मस्ककडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी स्विगीचे उत्तर लगेच दिले.
शुभमन गिल सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळत आहे. चालू हंगामात शुभमन उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 96 धावा आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 84 धावा केल्या आहे. मात्र या मोसमात शुभमन दोनदा खाते न उघडताच बाद झाला होता. शुभमनने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळला आहे. त्यात त्याने 229 धावा केल्या आहे. शुभमन गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळताना दिसला होता. या हंगामात त्याला गुजरात संघाने मेगा लिलावात 8 कोटींची बोली लावून विकत घेतले आहे.
Web Title: Shubman Gill Request To Twitter New Boss Elon Musk On Swiggy Complaint
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..